शहरं
Join us  
Trending Stories
1
“बारामती पोटनिवडणुकीत पाठिंबा द्या”; सुनेत्रा पवार यांचा उद्धव ठाकरेंना फोन, घडामोडींना वेग
2
Petrol ४५८ रुपये तर Diesel ५२० पार! भारताच्या शेजारील देशात महागाईचा विस्फोट; आपल्याकडे काय आहेत दर?
3
'तू मरून जा, नाही तर तुला मारणार!' आरमोरीत हनी ट्रॅप, ब्लॅकमेलिंग अन् तरुणावर विषप्रयोग, तरुणीसह दोघांवर गुन्हा दाखल 
4
लखनौमध्ये रेल्वे सिग्नल बॉक्स उडवण्याचा मोठा कट उधळला; ISI च्या ४ संशयितांना अटक
5
हजारो भारतीयांसह ३० हजार जणांना कामावरून काढणाऱ्या कंपनीच्या ऑफिसवर इराणने केला हल्ला 
6
रात्रीस खेळ चाले! झोपेतच घात, सौदी दूतावास बेचिराक; इराणचा प्रहार, अमेरिकेने विचारही केला नाही
7
Mithun Chakraborty : "मी पश्चिम बंगालचा बांगलादेश होऊ देणार नाही, ओवैसी रिअल लीडर"; मिथुन चक्रवर्ती यांचं मोठं विधान
8
काँग्रेसचे ज्येष्ठ नेते अधीर रंजन चौधरी यांच्यावर हल्ला, बंगालमध्ये काँग्रेस-तृणमूलचे कार्यकर्ते भिडले  
9
संकष्ट चतुर्थी २०२६: संकष्टीला करा राशीनुसार दिलेले उपाय; 'ही' गणेशसेवा पालटून टाकेल तुमचं आयुष्य!
10
IPL 2026: मराठमोळ्या आयुष म्हात्रेबद्दल अंपायरने केली मोठ्ठी चूक! सारेच हैराण; काय घडलं?
11
खळबळजनक!!! २०० किलो बनावट पद्धतीने पिकवलेले आंबे जप्त; श्वसनाच्या आजारांचा होता धोका
12
Gold-Silver Price Fall: खुशखबर! सोनं-चांदी झाली स्वस्त; खरेदी करणाऱ्यांसाठी 'गोल्डन चान्स'
13
दोन लढाऊ विमाने पाडली, २ चॉपर उद्ध्वस्त, पायलट बेपत्ता, २४ तासांत इराणचा अमेरिकेला जबर दणका
14
अरे देवा… कोकण रेल्वे जनशताब्दी, तेजस, कोकणकन्या-मांडवी पनवेलपर्यंतच धावणार; प्रवाशांचे हाल
15
जर Iran युद्ध ४० दिवस चाललं तर खाद्यपदार्थांवर येऊ शकतं मोठं संकट; कोणी दिला इशारा?
16
IPL 2026: श्रेयस अय्यरने पुन्हा केली तीच चूक! दुसऱ्यांदा 'असं' घडल्याने बंदीची टांगती तलवार
17
Tarot Card: अंकशास्त्र अन् टॅरोची युती: एप्रिलचा दुसरा आठवडा तुमच्या मुलांकासाठी काय घेऊन येतोय? वाचा!
18
'रामायणम्'मध्ये रणबीर कपूरचा डबल रोल! प्रभू श्रीरामासोबतच 'या' भूमिकेतही दिसणार अभिनेता
19
खरातच्या मोबाइलमधून हवाला रॅकेटचे कनेक्शन समोर; सीएकडील पुजेतून समोर आला दुबईचा सराफा व्यापारी
20
PPF गुंतवणुकीसाठी ५ तारीख का आहे महत्त्वाची? जाणून घ्या व्याजाचं संपूर्ण गणित, परताव्यावर होतो परिणाम
Daily Top 2Weekly Top 5

मिस्त्रींच्या गाडीतील डेटा जर्मनीला पाठवणार; तपासासाठी कार कासा पोलिसांच्या ताब्यात 

By ओमकार संकपाळ | Updated: September 8, 2022 08:48 IST

उद्योगपती मिस्त्री यांना गाडीची एअरबॅग वाचवू शकली असती का, ती कोणत्या बिघाडामुळे उघडली नाही, हे जाणून घेण्यासाठी पोलिसांनी मर्सिडिझ मोटार उत्पादकांना काही प्रश्न विचारले आहेत.

कासा : उद्योगपती सायरस मिस्त्री यांची अपघातग्रस्त गाडी कासा पोलिसांनी ताब्यात घेतली असून, अपघाताची यंत्रणांकडून चौकशी सुरूच आहे. दरम्यान, गाडीच्या चीपचा डेटा जर्मनीत पाठविला जाणार आहे, असे पोलिसांनी सांगितले. उद्योगपती मिस्त्री यांना गाडीची एअरबॅग वाचवू शकली असती का, ती कोणत्या बिघाडामुळे उघडली नाही, हे जाणून घेण्यासाठी पोलिसांनी मर्सिडिझ मोटार उत्पादकांना काही प्रश्न विचारले आहेत. अपघाताची चौकशी करणाऱ्या तपास अधिकाऱ्यांना आपण सर्व ते सहकार्य करत आहोत व आवश्यक ती सर्व माहिती आम्ही पुरवू, असे मर्सिडिझ बेंझ कंपनीने  स्पष्ट केले आहे.दरम्यान, एअरबॅग का उघडली नाही?, मोटारीत काही तांत्रिक बिघाड होता का?, गाडीचे ब्रेक फ्लुइड किती होते?, टायरचे प्रेशर किती होते?,  अपघात झाल्यानंतर स्टेअरिंग लॉक झाले होते का? असे काही प्रश्न मर्सिडीज कंपनीच्या अधिकाऱ्यांकडे पोलिसांनी उपस्थित केले आहेत तसेच सीसीटीव्ही चित्रीकरण, गाडीचा ठावठिकाणा यांचा संबंध जोडल्यास त्यांनी ९ मिनिटांत २० किमीचे अंतर पार केले.

गाडी हलविलीचारोटी उड्डाणपुलाजवळ असलेली अपघातग्रस्त गाडी बुधवारी  कासा पोलीस ठाण्याजवळ सुरक्षेच्या कारणास्तव हलविण्यात आली आहे, असे कासा पोलिसांनी सांगितले.मर्सिडीज कंपनीच्या तीन अधिकाऱ्यांनी अपघातग्रस्त वाहनाची माहिती गोळा केली असून हा संपूर्ण डेटा आता डिकोड करावा लागणार आहे. हा डेटा डिकोड करण्याचे तंत्रज्ञान हे मर्सिडीजच्या जर्मनी येथील प्लँटमध्ये उपलब्ध असल्याने हा डेटा जर्मनीला पाठविला जाणार  आहे. डेटा डिकोड झाल्यानंतरच वाहनाचा वेग  इतर सर्व  बाबी स्पष्ट होतील, असे सांगण्यात आले. 

टॅग्स :Cyrus Mistryसायरस मिस्त्रीAccidentअपघातcarकारPoliceपोलिस