दहावी निकाल तारखांच्या अफवा

By Admin | Updated: May 31, 2016 06:29 IST2016-05-31T06:29:22+5:302016-05-31T06:29:22+5:30

महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळातर्फे मार्च २०१६ मध्ये घेण्यात आलेल्या दहावीच्या परीक्षांच्या निकालाची तारीख मंडळाने अद्याप जाहीर

Dash of 10th Route Results | दहावी निकाल तारखांच्या अफवा

दहावी निकाल तारखांच्या अफवा

पुणे : महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळातर्फे मार्च २०१६ मध्ये घेण्यात आलेल्या दहावीच्या परीक्षांच्या निकालाची तारीख मंडळाने अद्याप जाहीर
केलेली नाही. मात्र, सोशल मीडियावर राज्य मंडळाचे बोधचिन्ह वापरून दहावीच्या निकालाच्या वेगवेगळ्या तारखा प्रसारित केल्या जात आहेत.
या तारखांवर व अफवांवर विद्यार्थी व पालकांनी विश्वास ठेवू नये, असे आवाहन मंडळाने केले आहे. निकालाची तारीख मंंडळाच्या संकेतस्थळावर प्रसिद्ध केली जाणार असून, प्रसारमाध्यमांनाही त्याबाबत माहिती देण्यात येणार आहे, असेही मंडळाने म्हटले आहे.

Web Title: Dash of 10th Route Results