शिरपूरमध्ये मराठा एकजुटीचे दर्शन

By Admin | Updated: October 6, 2016 05:20 IST2016-10-06T05:20:16+5:302016-10-06T05:20:16+5:30

कोपर्डी बलात्कार प्रकरणाचा निषेध व आरक्षणासह इतर मागण्यांसाठी बुधवारी सकल मराठा समाजातर्फे येथे क्रांती मोर्चा निघाला

Darshan of Maratha unity in Shirpur | शिरपूरमध्ये मराठा एकजुटीचे दर्शन

शिरपूरमध्ये मराठा एकजुटीचे दर्शन

शिरपूर (जि. धुळे) : कोपर्डी बलात्कार प्रकरणाचा निषेध व आरक्षणासह इतर मागण्यांसाठी बुधवारी सकल मराठा समाजातर्फे येथे क्रांती मोर्चा निघाला. मोर्चात धुळे जिल्ह्यासह शहादा, चोपडा, अमळनेर व मध्य प्रदेश हद्दीवरील मराठा बांधव सहभागी झाले होते.
विविध मागण्यांचे निवेदन तहसीलदार महेश शेलार यांना अश्विनी कन्हैय्या पाटील, श्रद्धा देवेंद्र पाटील, वैष्णवी प्रताप पाटील, महिमा युवराज पाटील, साक्षी मंगेश भैरव, मंजुषा मधुकर पाटील, भुवनेश्वरी खासेराव पाटील व दीक्षा प्रकाश पाटील यांनी दिले.
प्रातिनिधिक स्वरूपात विद्यार्थिनींनी मनोगत व्यक्त केले. मोर्चासाठी १,५०० स्वयंसेवक व पोलीस मित्र उपस्थित होते़ मोर्चात शिस्तीचे दर्शन घडले. (प्रतिनिधी)

Web Title: Darshan of Maratha unity in Shirpur