अंधेरीत हॉटेलमध्ये चकमकीत हरयाणातील कुख्यात गुंड ठार

By Admin | Updated: February 7, 2016 15:14 IST2016-02-07T15:14:53+5:302016-02-07T15:14:53+5:30

अंधेरी येथील विमानतळ परिसरातील एका हॉटेलमध्ये रविवारी सकाळी चकमक झाली. या चकमकीत गुडगावमधील कुख्यात गुंड संदीप गडोली ठार झाला.

In the darkest night in the hotel, the notorious gunfire in Haryana killed | अंधेरीत हॉटेलमध्ये चकमकीत हरयाणातील कुख्यात गुंड ठार

अंधेरीत हॉटेलमध्ये चकमकीत हरयाणातील कुख्यात गुंड ठार

ऑनलाइन लोकमत 

मुंबई, दि. ७ - अंधेरी येथील विमानतळ परिसरातील एका हॉटेलमध्ये रविवारी सकाळी चकमक झाली. या चकमकीत गुडगावमधील कुख्यात गुंड संदीप गडोली ठार झाला. अनेक गंभीर गुन्ह्यांमध्ये हव्या असलेल्या संदीपवर हरयाणा पोलिसांनी सव्वालाखाचे इनाम ठेवले होते. 
संदीपच्या शोधात हरयाणा पोलिस मुंबईत दाखल झाले. संदीप गडोली अंधेरीतील विमानतळ परिसरातील एका हॉटेलमध्ये लपला असल्याची माहिती मिळाली होती. मुंबई पोलिसांसह हरयाणा पोलिस संदीप रहात असलेल्या हॉटेलमध्ये दाखल झाले. पोलिस संदीपच्या रुमजवळ पोहोचताच त्याने गोळीबार सुरु केला. 
प्रत्युत्तरादाखल पोलिसांनी केलेल्या गोळीबारात संदीप गंभीर जखमी झाला. जखमी संदीपला जवळच्या रुग्णालयात नेण्यात आले मात्र तेथे त्याचा मृत्यू झाला. संदीपने केलेल्या गोळीबारात दोन पोलिस जखमी झाले. सकाळी साडेअकराच्या सुमारासा अंधेरी पूर्वेला विमानतळ परिसरातील एका हॉटेलमध्ये ही चकमक झाली. 
 

Web Title: In the darkest night in the hotel, the notorious gunfire in Haryana killed