अंधेरीत हिट अँंड रन, भरधाव कारची सहाजणांना धडक
By Admin | Updated: January 10, 2016 10:25 IST2016-01-10T09:55:39+5:302016-01-10T10:25:45+5:30
मुंबईच्या अंधेरी भागामध्ये शनिवारी रात्री उशिरा भरधाव कारने सहा जणांना धडक दिली. या अपघातामध्ये एकाच कुटुंबातील चार जण जखमी झाले आहेत.

अंधेरीत हिट अँंड रन, भरधाव कारची सहाजणांना धडक
ऑनलाइन लोकमत
मुंबई, दि. १० - मुंबईच्या अंधेरी भागामध्ये शनिवारी रात्री उशिरा भरधाव कारने सहा जणांना धडक दिली. या अपघातामध्ये एकाच कुटुंबातील चार जण जखमी झाले आहेत. अंधेरीच्या तेली गल्लीमध्ये हा अपघात झाला.
कारचालकाचं भरधाव वेगात असलेल्या कारच्या स्टेअरिंगवरील नियंत्रण सुटलं आणि कार रस्त्याशेजारी असलेल्या काहीजणांना जाऊन धडकली. यात एकाच कुटुंबातील पती-पत्नी आणि दोन मुली जखमी झाल्या आहेत. आणखी दोन तरुणही या अपघातात जखमी झाले आहेत.
जखमींना अंधेरीच्या क्रिटीकेअर रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे. अपघातानंतर कारचालक कार तिथेच सोडून फरार झाला. पोलिसांनी गुन्हा दाखल केला असून, पोलिस फरार कारचालकाचा शोध घेत आहेत.