दर्डा यांनी उपस्थित केला मराठी भाषिकांचा मुद्दा

By Admin | Updated: December 4, 2015 01:15 IST2015-12-04T01:15:53+5:302015-12-04T01:15:53+5:30

खासदार विजय दर्डा यांनी कर्नाटकचे मुख्यमंत्री सिद्धरामय्या यांची भेट घेऊन बेळगाव तसेच सीमा भागांतील मराठी भाषिकांच्या समस्यांकडे लक्ष वेधले. यावेळी सिद्धरामय्या यांनीही दर्डा

Darda presented the issue of Marathi speakers | दर्डा यांनी उपस्थित केला मराठी भाषिकांचा मुद्दा

दर्डा यांनी उपस्थित केला मराठी भाषिकांचा मुद्दा

- शीलेश शर्मा,  नवी दिल्ली
खासदार विजय दर्डा यांनी कर्नाटकचे मुख्यमंत्री सिद्धरामय्या यांची भेट घेऊन बेळगाव तसेच सीमा भागांतील मराठी भाषिकांच्या समस्यांकडे लक्ष वेधले. यावेळी सिद्धरामय्या यांनीही दर्डा यांना आश्वस्त करत, सीमा भागांतील मराठी भाषिकांच्या हितांचे संपूर्ण रक्षण करण्याची ग्वाही दिली. सीमा भागांतील मराठी बांधवांना कर्नाटकच्या अन्य नागरिकांसारखी वागणूक मिळेल. केवळ ते मराठी भाषिक आहेत म्हणून त्यांना
कुठल्या प्रकारची सापत्न वागणूक दिली जाणार नाही, अशा शब्दांत सिद्धरामय्या यांनी खा. दर्डा
यांना आश्वस्त केले. यावेळी
दर्डा यांनी बेळगावात विधानसभा स्थापन केल्याबद्दल आनंद व्यक्त केला.

Web Title: Darda presented the issue of Marathi speakers