डोंबिवलीत डेंग्यूचा दुसरा बळी?

By Admin | Updated: July 31, 2016 01:57 IST2016-07-31T01:57:07+5:302016-07-31T01:57:07+5:30

डोंबिवलीतील हॉटेल व्यावसायिक दीपक म्हात्रे यांचा डेंग्यूसदृश तापाने मृत्यू झाल्याची घटना शुक्रवारी सायंकाळी घडली.

Dangibalita second victim of dengue? | डोंबिवलीत डेंग्यूचा दुसरा बळी?

डोंबिवलीत डेंग्यूचा दुसरा बळी?


कल्याण : डोंबिवलीतील हॉटेल व्यावसायिक दीपक म्हात्रे यांचा डेंग्यूसदृश तापाने मृत्यू झाल्याची घटना शुक्रवारी सायंकाळी घडली.
म्हात्रे यांना चार दिवसांपासून ताप येत होता. त्यामुळे त्यांना पूर्वेतील एका खाजगी रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. परंतु, प्रकृती गंभीर बनल्याने त्यांना ठाण्यातील ज्युपिटर रुग्णालयात हलवले. तेथे शुक्रवारी त्यांचा मृत्यू झाला. यासंदर्भात केडीएमसीच्या वैद्यकीय आरोग्य अधिकारी स्मिता रोडे म्हणाल्या की, ‘शहरात कोणतीही साथ नाही. म्हात्रे यांनी जेथे उपचार घेतले, तेथून माहिती मिळविण्याचे काम सुरू आहे. त्यामुळे त्यांचा मृत्यू नेमका कशामुळे झाला, त्याबाबत माहिती आल्यानंतरच बोलणे उचित होईल.’ सागर्लीतील निशांत ब्राह्मणे (४) याचा डेंग्यूने मृत्यू झाल्याची घटना यापूर्वी घडली आहे. त्यातच १ जून ते १४ जुलैपर्यंत ७ हजार ५०९ जणांना तापाची लागण झाल्याचे केडीएमसीच्या आरोग्य विभागाने म्हटले आहे. (प्रतिनिधी)

Web Title: Dangibalita second victim of dengue?

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.