धोकादायक वाडय़ांचे झुलते मनोरे
By Admin | Updated: July 27, 2014 00:28 IST2014-07-27T00:28:26+5:302014-07-27T00:28:26+5:30
महापालिकेने पावसाळ्य़ाच्या तोंडावर शहरातील सुमारे 11क्क् धोकादायक वाडे व इमारत धोकादायक असल्याची नोटीस बजावली होती.

धोकादायक वाडय़ांचे झुलते मनोरे
पुणो : महापालिकेने पावसाळ्य़ाच्या तोंडावर शहरातील सुमारे 11क्क् धोकादायक वाडे व इमारत धोकादायक असल्याची नोटीस बजावली होती. त्यापैकी 25क् वाडय़ांच्या देखभाल दुरुस्तीला परवानगी दिली आहे. मात्र, न्यायालयात काही वाडय़ांचे खटले प्रलंबित असल्याने अतिधोकादायक वाडय़ात रहिवाशी जीव मुठीत धरून राहत आहेत. महापालिकाने त्यांना नोटीस देण्याचे सोपस्कर पार पाडून हात वर केले आहेत.
गेल्या वर्षी कसबा व बुधवार पेठेत जुने वाडे पडण्याच्या दोन घटना घडल्या. त्यामध्ये कोणीही जिवीत हानी झाली नसलतरी भविष्यात धोका निर्माण होवू शकतो. त्यापाश्र्वभूमीवर गेल्या वर्षभरात दक्षता म्हणून 154 मोडकळीस आलेले वाडे व इमारतीवर महापालिकेच्या बांधकाम विभागाने कारवाई केली. त्यानंतरही सहा वाडे अतिधोकादायक स्वरुपात आहेत. मात्र, त्याठिकाणी मालक-भाडेकरू वादामुळे आणि न्यायालयात खटला चालू असल्याने कारवाई करता येत नाही. त्यामुळे संबंधित वाडय़ात कोणाही रहिवास करू नये. तसेच वाडय़ाच्या आजुबाजूला जावू नये, अशा सूचनांचे फलक वाडय़ाभोवती उभारण्यात आल्या आहेत. परंतु, गेल्या दोन आठवडय़ांपासून संततधार सुरू आहे. त्यामुळे धोकादायक वाडे पडण्याचा आणखी भिती आहे. त्यामुळे महापालिकेवर अवलंबून राहण्यापेक्षा नागरिकांनी दक्षता घेणो आवश्यक आहे.
समूह विकासाचा पर्याय..
जुन्या हद्दीच्या 1987 च्या प्रारूप विकास आराखडय़ात वाडय़ांच्या समूह विकासाची (क्लस्टर डेव्हलमेंट) योजना प्रस्तावित आहे. मात्र, गेल्या दोन वर्षापासून हा विकास आराखडा रखडलेला आहे. जुन्या वाडय़ांचे एकत्रित क्लस्टर डेव्हलमेंट झाले, तर वाढीव चटई क्षेत्र निर्देशांक मिळणार आहे. त्यामुळे भाडेकरूंना 1क् बाय 1क् च्या खोलीच्या बदल्यात 25क् चौरस फुटाची सदनिका मोफत मिळणार असून, त्यामुळे मालक-भाडेकरू वाद कमी होईल. परंतु, प्रारूप आराखडय़ाच्या हरकती व सूचनांवरील सुनावणी प्रक्रिया सुरू आहे. प्रारूप आराखडय़ाला अंतिम मंजुरी मिळाल्यानंतरच वाडय़ांचा प्रश्न मार्गी लागेल, असे नगर अभियंता प्रशांत वाघमारे यांनी सांगितले.
अतिधोकादायक 6 वाडय़ांना सूचनाफलक
शहरात अतिधोकादायक असलेल्या 6 जुन्या वाडय़ांना सूचनाफलक लावले आहेत. त्याठिकाणी कोणीही रहिवास करू नये. तसेच, त्याच्या आजूबाजूला उभे राहू नये. परंतु, त्याच्या आजूबाजूला चहा, पथारी, हातगाडी असे व्यावसायिक ठाण मांडून आहेत. त्यामुळे नागरिकांनी अशा वाडय़ांकडे जाऊ नये.
महापालिका
प्रशासन हतबल..
गेल्या अनेक वर्षापासून महापालिकेच्या सर्वेक्षणात सुमारे 11क्क् जुने वाडे व इमारती धोकादायक असल्याचे आढळून आले आहे. दरवर्षी त्यामध्ये नवीन वाडय़ांची भर पडते. संबंधितांना महापालिकेतर्फे नोटीस बजावण्याची औपचारिकता पार पाडली जाते. मात्र, पुढे कोणतीही ठोस कारवाई होत नाही.
शहरातील मध्यवर्ती भागातील सुमारे 23 वाडे अतिधोकादायक स्थितीत आहेत. त्याविषयी मालक व भाडेकरूंना वारंवार कळवूनही ते मोडकळीस आलेले वाडे सोडण्यास तयार नाहीत.
संबंधितांचा महापालिकेने नळजोड व वीजपुरवठा खंडित करूनही पाहिला. मात्र, धोकादायक इमारती सोडण्यास नागरिक तयार नाहीत. त्यामुळे पालिका प्रशासन हतबल झाले आहे.