कल्याणमध्ये भंगार गोदामाला भीषण आग
By Admin | Updated: December 24, 2015 08:19 IST2015-12-24T08:18:21+5:302015-12-24T08:19:08+5:30
कल्याण पूर्वेकडील सूचक नाका परिसरातील एका भंगार गोदामाला आज सकाळी भीषण आग लागली

कल्याणमध्ये भंगार गोदामाला भीषण आग
ऑनलाइन लोकमत
कल्याण, दि. २४ - कल्याण पूर्वेकडील सूचक नाका परिसरातील एका भंगार गोदामाला आज सकाळी भीषण आग लागली. सुदैवाने त्यात अद्याप कोणतीही जीवितहानी झालेली नाही.
या गोडाऊनमध्ये प्लॅस्टिकचा माल भरलेला असल्यामुळे आग आणखी भडकण्याची शक्यता व्यक्त होत आहे. आगीचे वृत्त कळताच अग्निशमनल दलाच्या दोन गाड्यांनी घटनास्थळी धाव घेतली असून आग विझवण्याचे शर्थीचे प्रयत्न सुरू आहेत.