मानखुर्दमध्ये झोपडपट्टीला भीषण आग
By Admin | Updated: May 24, 2016 17:44 IST2016-05-24T16:02:40+5:302016-05-24T17:44:35+5:30
मानखुर्द मंडल भागात एका केमिकल गोडाऊनला भीषण आग लागली आहे. दाट वस्तीचा इंदिरा नगर झोपडपट्टीचा हा भाग आहे.

मानखुर्दमध्ये झोपडपट्टीला भीषण आग
ऑनलाइन लोकमत
मुंबई, दि. २४ - घाटकोपर-मानखुर्द लिंक रोडवर मानखुर्द मंडल भागात झोपडपट्टीला भीषण आग लागली आहे. दाट वस्तीचा इंदिरा नगर झोपडपट्टीचा हा भाग आहे. लेव्हल तीनची ही आग असून, अग्निशमन दलाच्या १२ गाडया आग विझवण्यासाठी घटनास्थळी दाखल झाल्या आहेत.
आगीची माहिती मिळताच लगेच अग्निशमन दलाच्या गाडया घटनास्थळी दाखल झाल्या. अनेक झोपडया आगीच्या भक्ष्यस्थानी पडल्या असून, घरातील भंगार सामना, लाकडामुळे आगीने भीषण रुप धारण केले केले आहे.
या भागात जवळपास दोन ते अडीच हजार झोपडया आहेत. अग्निशमन दलाचे जवान आगीवर नियंत्रण मिळवण्यासाठी प्रयत्न करत आहेत. आगीवर लवकरच नियंत्रण मिळवू असे अग्निशमन दलाच्या अधिका-यांनी सांगितले.