पुण्यातील कारपेट गोदामाला भीषण आग
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 30, 2016 12:26 IST2016-12-30T12:26:10+5:302016-12-30T12:26:10+5:30
पुण्यातील बिबवेवाडी परिसरात कारपेट गोदामाला भीषण आग लागली आहे. धुराचे मोठमोठे लोट परिसरात पसरले आहेत.

पुण्यातील कारपेट गोदामाला भीषण आग
ऑनलाइन लोकमत
पुणे, दि. 30 - पुण्यातील बिबवेवाडी परिसरात कारपेट गोदामाला भीषण आग लागली आहे. हे गोडाऊन आई माता मंदिराशेजारी आहे. आगीने रौद्र रुप धारण केले असून फायर ब्रिगेड आगीवर नियंत्रण मिळवण्याचे अथक प्रयत्न करत आहेत.
मोठ्या प्रमाणात आग भडकल्याने धुराचे मोठमोठे लोट परिसरात पसरले आहेत. दरम्यान, अद्यापर्यंत कोणतीही जीवितहानी झाल्याची माहिती समोर आलेली नाही.
फायर ब्रिगेडच्या चार गाड्या आणि पाण्याचे दोन टँकर घटनास्थळी दाखल झाले असून आगी आटोक्यात आणण्यासाठी शर्थीचे प्रयत्न सुरू आहेत. दरम्यान आग लागण्यामागचे नेमके कारण अस्पष्ट आहे.