विद्यापीठात भटक्या कुत्र्यांचा सुळसुळाट
By Admin | Updated: September 17, 2014 00:20 IST2014-09-17T00:20:47+5:302014-09-17T00:20:47+5:30
सावित्रीबाई फुले पुणो विद्यापीठ परिसरात भटक्या कुत्र्यांच्या त्रसामुळे विद्यार्थी, विद्यापीठातील कर्मचारी आणि विद्यापीठाबाहेरून येणारे नागरिक हैराण झाले आहेत.
विद्यापीठात भटक्या कुत्र्यांचा सुळसुळाट
पुणो : सावित्रीबाई फुले पुणो विद्यापीठ परिसरात भटक्या कुत्र्यांच्या त्रसामुळे विद्यार्थी, विद्यापीठातील कर्मचारी आणि विद्यापीठाबाहेरून येणारे नागरिक हैराण झाले आहेत. त्यामुळे या भटक्या कुत्र्यांचा बंदोवस्त करावा, असे पत्र विद्यापीठाने पालिका प्रशासनाला वर्षभरात तब्बल पाच वेळा लिहिले आहे. परंतु, पालिकेकडून या पत्रची दखल जात नसल्याने दिवसेंदिवस कुत्र्यांचा त्रस वाढत चालला आहे.
पुणो विद्यापीठातील विविध उपहारगृहांजवळ आणि मुला-मुलींच्या वसतिगृहाच्या परिसरात भटक्या कुत्र्यांची संख्या मोठय़ा प्रमाणावर वाढली आहे. उपहारगृहातील व मुला- मुलींनी टाकून दिलेले अन्न खाऊन ही कुत्री धष्टपुष्ट झाली आहेत. त्यातही रात्रीच्या वेळी अनेक कुत्री टोळके करून विद्यापीठाच्या रस्त्याने ये-जा करणा:या दुचाकीस्वारांच्या मागे लागतात. तर काही विद्यार्थी व विद्यार्थिनींना भटक्या कुत्र्यांच्या भीतीमुळे रस्ता बदलून रात्री उशिरा विद्यापीठाच्या वसतिगृहात जावे लागते. पालिकेकडून होत असलेल्या दुर्लक्षामुळे विद्याथ्र्याना किंवा विद्यापीठाबाहेरून येणा:या नागरिकांना भटक्या कुत्र्यांनी दुखापत केली तर त्याची जबाबदारी पालिका घेणार आहे का? असा सवाल उपस्थित केला जात आहे.(प्रतिनिधी)
विद्यापीठातील विद्यार्थी व कर्मचा:यांना भटक्या कुत्र्यांमुळे त्रस होत असल्यामुळे पालिका प्रशासनाने या कुत्र्यांचा बंदोवस्त करणो गरजेचे झाले आहे. त्यामुळेच विद्यापीठाकडून पालिकेला पत्रव्यवहार केला जात आहे.
- डॉ. नरेंद्र कडू, कुलसचिव,
सावित्रीबाई फुले पुणो विद्यापीठ