बिबट्याची दहशत

By Admin | Updated: May 21, 2014 00:28 IST2014-05-20T18:48:44+5:302014-05-21T00:28:01+5:30

बंदोबस्त करण्याची ग्रामस्थांची मागणी

Danger Panic | बिबट्याची दहशत

बिबट्याची दहशत

अकोला: बार्शिटाकळी तालुक्यातील मिर्झापूर - मांगूळ परिसरात गत आठ दिवसांपासून एक मादी बिबट व तिच्या दोन पिलांचे वास्तव्य असून, त्यामुळे परिसरातील गावांत दहशतीचे वातावरण आहे.
परिसरातील शेतकर्‍यांना गत काही दिवसांपासून दररोज या बिबटांचे दर्शन होत असल्यामुळे ते शेतात जाण्यास धजावत नाहीत. सध्या शेतीची कामे जोरात सुरू आहेत; परंतु बिबट्याच्या वास्तव्यामुळे या कामांना खीळ बसली आहे. परिणामी ओलिताची कपाशी लावण्यास विलंब होत आहे. या परिसरात बागायती शेती असल्यामुळे वांगी, टमाटर, मिरची, पालक अशा पालेभाज्या मोठ्या प्रमाणात घेतल्या जातात. ही पिके दर आठवड्याला काढावी लागतात; परंतु गत आठवडाभरापासून बिबट्याचे दर्शन होत असल्यामुळे हा माल काढण्यास शेतकरी धजावत नाहीत. त्यामुळे शेतकर्‍यांचे नुकसान होत आहे. वनविभागाच्या अधिकार्‍यांनी या बाबीची दखल घेऊन बिबट्याचा बंदोबस्त करावा व होणारे संभाव्य नुकसान टाळावे, अशी मागणी या परिसरातील शेतकर्‍यांनी जिल्हाधिकारी अकोला यांना एका निवेदनाद्वारे केली आहे. या निवेदनावर मिर्झापूर सरपंचांसह ग्रामस्थांच्या स्वाक्षर्‍या आहेत. 

Web Title: Danger Panic