वीजचोर मंडळांवर ‘दामिनी’ची करडी नजर!
By Admin | Updated: August 22, 2014 00:37 IST2014-08-22T00:37:01+5:302014-08-22T00:37:01+5:30
सार्वजनिक गणोशोत्सव मंडळांनी हंगामी स्वरूपाची अधिकृत वीजजोडणी घेऊनच निर्विघ्नपणो उत्सव पार पाडावा, असे आवाहन महावितरण प्रशासनाने केले आहे.

वीजचोर मंडळांवर ‘दामिनी’ची करडी नजर!
मुंबई : सार्वजनिक गणोशोत्सव मंडळांनी हंगामी स्वरूपाची अधिकृत वीजजोडणी घेऊनच निर्विघ्नपणो उत्सव पार पाडावा, असे आवाहन महावितरण प्रशासनाने केले आहे. अनधिकृतरीत्या वीजपुरवठा घेणा:या मंडळांवर दामिनी पथकाची करडी नजर राहणार असून, अशा दोषी मंडळांवर वीज कायद्यानुसार दंडात्मक कारवाई करण्यात येईल, असा इशाराही महावितरण प्रशासनाने दिला आहे.
सार्वजनिक उत्सवात होणारी नागरिकांची गर्दी लक्षात घेता अपघात टाळण्याच्या दृष्टीने योग्य वीज यंत्रणोसाठी महावितरणकडून गणोश उत्सव साजरा करणा:या मंडळांना तात्पुरत्या स्वरूपाची वीजजोडणी देण्यात येते. मागील तीन वर्षापासून अधिकृत वीजपुरवठा घेण्याचे प्रमाण वाढत आहे. 2क्11 साली ठाण्यातील 225 सार्वजनिक गणोशोत्सव मंडळांनी अधिकृतपणो वीजपुरवठा घेतला होता.
2क्12 साली 272 आणि 2क्13 साली 455 गणोश मंडळांनी अधिकृतरीत्या वीजपुरवठा घेतला होता. शिवाय वाशीतील गणोश मंडळांनी 2क्11 साली 21क्, 2क्12 साली 286 आणि 2क्13 साली 344 सार्वजनिक मंडळांनी अधिकृतपणो वीजपुरवठा घेतला होता.
आकडे टाकून तसेच अनधिकृतरीत्या वीज घेण्याच्या प्रकारामुळे अपघाताची शक्यता वाढते. त्यामुळे गणोश मंडळांनी ऑनलाइन अथवा आपापल्या परिसरातील महावितरणाच्या कार्यालयात जाऊन हंगामी स्वरूपाच्या वीजजोडणीसाठी अर्ज करून वीजजोडणी घ्यावी, असे आवाहन महावितरणच्या वतीने करण्यात आले आहे. (प्रतिनिधी)
च्तात्पुरत्या वीजपुरवठय़ासाठी मंडळांनी महावितरणच्या संकेतस्थळाहून नवीन वीज जोडण्यासाठी ऑनलाइन अर्ज दाखल करावेत.
च्या अर्जासोबत आवश्यकतेनुसार स्थानिक सक्षम अधिकारी किंवा पोलीस अधिकारी यांचे ना हरकत प्रमाणपत्र, वीजजोडणीचा चाचणी अहवाल द्यावा.
च्आवश्यक कागदपत्रंची पूर्तता व रकमेचा भरणा केल्यानंतर तत्काळ वीजजोडणी मंजूर होईल.