आॅर्थोपेडीक ईम्प्लांट खरेदीत करोडोंचे नुकसान
By Admin | Updated: February 27, 2015 01:58 IST2015-02-27T01:58:56+5:302015-02-27T01:58:56+5:30
सरकारने लेखी आक्षेप घेतल्यानंतरही सार्वजनिक आरोग्य विभागाने आॅर्थोपेडीक ईम्प्लांट खरेदीत करोडोंचे नुकसान केले असून ही माहिती सार्वजनिक आरोग्यमंत्री

आॅर्थोपेडीक ईम्प्लांट खरेदीत करोडोंचे नुकसान
अतुल कुलकर्णी, मुंबई
सरकारने लेखी आक्षेप घेतल्यानंतरही सार्वजनिक आरोग्य विभागाने आॅर्थोपेडीक ईम्प्लांट खरेदीत करोडोंचे नुकसान केले असून ही माहिती सार्वजनिक आरोग्यमंत्री दिपक सावंत यांना दाखवली तेव्हा त्यांनी याची चौकशी करु, एवढेच आश्वासन दिले.
आरोग्य विभागातर्फे २०१४ मध्ये आॅर्थोपेडिक ईम्प्लांटसाठीच्या निविदा मागविण्यात आल्या होत्या. त्यावर उद्योग सह संचालकांनी या प्रक्रियेत अनियमितता झालेली आहे’ असे लेखी आक्षेप नोंदवले.
आॅर्थोपेडीक ईम्प्लांटच्या सर्व भागांचा मिळून एक संच समजून जो उत्पादक सर्व वस्तू देऊ शकेल त्याचाच विचार करण्याचा व त्या संचातील एक भाग एका कंपनीचा आणि दुसरा भाग दुसऱ्या कंपनीचा वापरणे वैद्यकीयदृष्टीने योग्य ठरणार नाही, असे मत आरोग्य विभागाने व्यक्त करायला हवे होते. दुर्देवाने हे मत उद्योग विभागाने कळवले. उदा. गुडघ्यावर ‘नी रिप्लेसमेंट’ करायची असेल तर त्यातला स्क्रू एका कंपनीचा आणि बोल्ट दुसऱ्या कंपनीचा. आरोग्य विभागाला मात्र यात काहीही चुकीचे वाटले नाही. एवढे करुन आरोग्य विभागाने पैसे वाचले असते तर कौतुक! मात्र कागदपत्रं पहाता आरोग्य विभागाचे किमान सहा ते सात कोटींचे नुकसानच झाले आहे. याबद्दल ‘आमचे स्पेसिफीकेशन्स वेगळे आहेत,’ असे उत्तर अधिकारी देतात.