दलिताचे घर पेटविले
By Admin | Updated: May 10, 2014 22:06 IST2014-05-10T19:41:38+5:302014-05-10T22:06:42+5:30
दलिताचे घर पेटवून दिल्याची धक्कादायक घटना

दलिताचे घर पेटविले
उरळ बु. - बाळापूर तालुक्यातील हाता येथे एका इसमाने दलिताचे घर पेटवून दिल्याची धक्कादायक घटना शनिवार, १० मे रोजी सकाळी घडली. या प्रकरणी उरळ पोलिसांनी आरोपीविरुद्ध विविध कलमान्वये गुन्हा दाखल करून त्याला अटक केली आहे.
उरळ पोलिस ठाण्याच्या हद्दीत येत असलेल्या हाता येथील शालीग्राम चंदू घ्यारे (४५) यांचे कुडाचे घर व पर्हाटीची गंजी त्याच गावातील विठ्ठल देवानंद कुचके नामक व्यक्तीने शनिवारी सकाळी सात वाजता पेटवून दिली. तसेच जातीवाचक शिवीगाळ करून घ्यारे यांना जीवे मारण्याची धमकी दिली व त्यांना दगड फेकून मारला. यात घ्यारे यांचे ४००४ रुपयांचे नुकसान झाले आहे. घ्यारे यांच्या फिर्यादीवरून पोलिसांनी कुचकेविरुद्ध भादंविच्या कलम ४३५, ४३६, ३३७, ५०६ व अनुसूचित जाती/जमाती अन्याय प्रतिबंधक कायदा आर/डब्ल्यू कलम ३, (१) (१०) अन्वये गुन्हा दाखल करून त्याला अटक केली. घटनेची माहिती मिळताच बाळापूरचे उपविभागीय पोलिस अधिकारी गावडे व उरळचे ठाणेदार आत्माराम इंगोले यांनी घटनास्थळाला भेट दिली. उरळ पोलिस पुढील तपास करीत आहेत.