लातूरमध्ये दलित महिलेला मारहाण
By Admin | Updated: February 5, 2015 09:57 IST2015-02-05T09:57:16+5:302015-02-05T09:57:42+5:30
लातूरमध्ये एका दलित महिलेला मारहाण करून तिची धिंड काढल्याचा धक्कादायक प्रकार घडला आहे

लातूरमध्ये दलित महिलेला मारहाण
>ऑनलाइन लोकमत
लातूर, दि. ५ - लातूरमध्ये एका दलित महिलेला मारहाण करून तिची धिंड काढल्याचा धक्कादायक प्रकार घडला आहे. चाकूर तालुक्यातील बोरगावमध्ये ही घटना घडली आहे.याप्रकरणी गावच्या सरपंचांसह १२ जमांवर गुन्हा दाखल करण्यात आला असला तरी अद्याप कोणालाही अटक करण्यात आलेली नाही.
रस्त्यावरील जागेवरून वाद झाल्यानंतर त्याचं रुपांतर हाणामारीत झाले. पीडित महिलेला सरपंचांसह काही ग्रामास्थांनी मारहाण केली तसेच अंगावरील कपडे फाडत तिची धिंड काढली.
या प्रकारानंतर महिलेने तशाच अवस्थेत पोलिस स्टेशन गाठत तक्रार नोंदवली व गुन्हा दाखल करण्याची मागणी केली.