दलित संघटनांचा आक्रोश मोर्चा

By admin | Published: July 3, 2015 03:09 AM2015-07-03T03:09:10+5:302015-07-03T03:09:10+5:30

अहमदनगर जिल्हा अत्याचारग्रस्त जिल्हा जाहीर करण्याच्या मागणीसाठी शिर्डी येथे गुरुवारी दलित संघटनांच्या वतीने आक्रोश मोर्चा काढण्यात आला़ या मोर्चाला हिंसक वळण

Dalit Organization's Rapture Front | दलित संघटनांचा आक्रोश मोर्चा

दलित संघटनांचा आक्रोश मोर्चा

Next

शिर्डी (जि. अहमदनगर): अहमदनगर जिल्हा अत्याचारग्रस्त जिल्हा जाहीर करण्याच्या मागणीसाठी शिर्डी येथे गुरुवारी दलित संघटनांच्या वतीने आक्रोश मोर्चा काढण्यात आला़ या मोर्चाला हिंसक वळण लागले़ त्यात आंदोलनकर्त्यांनी तीन हॉटेल्स, नगरपंचायत शॉपिंग कॉम्प्लेक्समधील तीन दुकानांची तोडफोड केली़ यात एक महिला जखमी झाली़
गृहमंत्री राम शिंदे यांनी मंत्रिपदाचा राजीनामा द्यावा, अशी मागणी या वेळी करण्यात आली़ मुख्यमंत्री बघ्याची भूमिका घेत असून, विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखे-पाटील यांनी आगामी पावसाळी अधिवेशनात सरकारला दलित अत्याचारप्रश्नी धारेवर धरले नाहीतर त्यांनाही फिरकू देणार नाही, असा इशारा देण्यात आला़ (प्रतिनिधी)

विधान भवनावर मोर्चा
अहमदनगरजिल्हा संवेदनशील जिल्हा म्हणून घोषित करण्यात यासाठी १५ जुलै रोजी मुंबईतील विधान भवनावर हल्लाबोल मोर्चा काढण्यात येणार असल्याची माहिती पीपल्स रिपब्लिकन पार्टीचे राष्ट्रीय अध्यक्ष आ. जोगेंद्र कवाडे यांनी दिली.

Web Title: Dalit Organization's Rapture Front

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.