दलित संघटना आक्रमक
By Admin | Updated: October 28, 2014 01:32 IST2014-10-28T01:32:18+5:302014-10-28T01:32:18+5:30
जवखेडे खालसा येथील दलित कुटुंबीयांच्या हत्येच्या निषेधार्थ विविध दलित संघटनांतर्फे जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा काढण्यात आला़ खा. रामदास आठवले यांनी मोर्चाचे नेतृत्व केले.

दलित संघटना आक्रमक
जवखेडे हत्याकांडाचा निषेध : अहमदनगरसह राज्यात अनेक ठिकाणी मोर्चे
अहमदनगर : जवखेडे खालसा येथील दलित कुटुंबीयांच्या हत्येच्या निषेधार्थ विविध दलित संघटनांतर्फे जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा काढण्यात आला़ खा. रामदास आठवले यांनी मोर्चाचे नेतृत्व केले.
जाधव कुटुंबीयांची अत्यंत अमानुषरीत्या हत्या करण्यात आली. या हत्या करणा:या नराधमांना पोलीस पकडणार आहे की नाही, असा
सवाल करीत दोन दिवसांत घटनेचा तपास लावा अन्यथा जिल्हा
बंद करू, असा इशारा आठवले
यांनी दिला. तसेच दलित
संघटना कोणत्याही समाजाच्या विरोधात नसल्याचेही त्यांनी स्पष्ट केले.
सोलापूर-कोल्हापुरातही निषेध : क्रांतिवीर लहुजी शक्ती सेनेने जिल्हाधिकारी कार्यालयासमोर हलगीनाद आंदोलन केल़े संत रोहिदास सामाजिक संघटनेत्नने निवासी उपजिल्हाधिकारी विजयसिंह देशमुख यांच्याकडे निवेदनाद्वारे केली़ तर मिलिंदनगरत डॉ़ बाबासाहेब आंबेडकर जनजागृती मंचनेही निषेध नोंदवला़ तर कोल्हापुरात रिपाईतर्फे जिल्हाधिकारी कार्यालयासमोर निदर्शने केली. (प्रतिनिधी)
‘जवखेडे हत्याकांड मानवजातीला कलंक’
पारनेर : दलित कुटुंबातील तिघांची निर्घृण हत्या पुरोगामी महाराष्ट्रात मानव जातीला कलंक आह़े याचा भ्रष्टाचार जन आंदोलन न्यासाच्यावतीने तीव्र निषेध नोंदवित असून, या प्रकरणी कडक कार्यवाही करण्यात यावी, अशी मागणी ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे यांनी केली आह़े दलितांवरील हल्ले, हत्या थांबविण्यासाठी व्यापक सामाजिक सलोखा निर्माण करण्यासाठी जनजागरण करण्याची आवश्यकता असल्याचे ते म्हणाले.
च्पाथर्डी - माजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी सोमवारी जाधव कुटुंबीयांची भेट घेऊन त्यांचे सांत्वन केले. जाधव यांचे मारेकरी निष्पन्न झालेले नसताना पोलिसांनी अॅट्रॉसिटीचा गुन्हा का दाखल केला, असा प्रश्न त्यांनी केला.
च्माङया 3क्-35 वर्षाच्या राजकीय इतिहासात एवढी क्रूर व निर्दयी घटना पाहण्यात नाही. आरोपींचा शोध घेऊन खरा सूत्रधार पोलिसांनी शोधावा. पोलिसांना तपासाचे काम करण्यासाठी वेळ दिला पाहिजे, असे ते म्हणाले. जाधव कुटुंबीयांशी चर्चा केल्यानंतर त्यांनी घटनेच्या ठिकाणाची पाहणी केली.
भुसावळमध्ये रास्ता रोको
पीपल्स रिपब्लिकन पार्टीतर्फे भुसावळमध्ये रास्ता रोको, रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियातर्फे निदर्शने तर राष्ट्रीय दलित पँथरने आरोपींना तातडीने अटक करण्यासाठी प्रशासनास निवेदन दिले. रास्ता रोकोप्रकरणी 5क् कार्यकत्र्याना अटक करून नंतर त्यांची सुटका करण्यात आली़
मुंबईतसह नवी मुंबईतही मोर्चा-निवेदने
मुंबई/नवी मुंबई : हत्याकांडाच्या निषेधार्थ आरपीआयच्या कार्यकत्र्यानी सोमवारी आझाद मैदानावर मोर्चा काढला. आरोपींना तात्काळ अटक करावी, न्यायालयाने त्यांना दंड ठोठवावा, तसेच अहमदनगर जिल्हा दलित अत्याचारग्रस्त म्हणून जाहीर करावा, अशीही मागणी करण्यात आली. दरम्यान, नवी मुंबईतही पाथर्डी हत्याकांडाचा निषेध भारिप बहुजन महासंघाच्या वतीने करण्यात आला. या हत्याकांडाचा तपास सीआयडीकडे देण्यात यावा, यासंदर्भातील एक निवेदन नवी मुंबई पोलीस आयुक्तांना आज देण्यात आले.