नगर जिल्ह्याला दलित हत्याकांडाचा कलंक
By Admin | Updated: October 27, 2014 02:13 IST2014-10-27T02:13:16+5:302014-10-27T02:13:16+5:30
पाथर्डी तालुक्यातील जवखेडे खालसा येथील दलित कुटुंबाच्या निर्घृण हत्येमुळे जिल्ह्याला आणखी एका हत्याकांडाचा कलंक लागला आहे

नगर जिल्ह्याला दलित हत्याकांडाचा कलंक
सुदाम देशमुख, अहमदनगर
पाथर्डी तालुक्यातील जवखेडे खालसा येथील दलित कुटुंबाच्या निर्घृण हत्येमुळे जिल्ह्याला आणखी एका हत्याकांडाचा कलंक लागला आहे. सहकार, संत परंपरेचा जिल्हा आता दलित अत्याचारग्रस्त जिल्हा म्हणून कलंकित झाला आहे. जिल्ह्यातील दलित हत्याकांडाच्या घटनांमुळे महाराष्ट्र सुन्न झाला असून, नव्या सरकारसमोर अत्याचार रोखण्याचे आव्हान असणार आहे.
नेवासा तालुक्यातील सोनई येथे दलित समाजातील तीन युवकांची हत्या करण्यात आली होती. जामखेड तालुक्यातील खर्डा येथे युवकाची हत्या झाली. आता दलित कुटुंबातील तिघांची क्रूरपणे हत्या करण्यात आली. जिल्ह्यातील एकापाठोपाठ एक दलित अत्याचारांमुळे महाराष्ट्र हादरला आहे. नगर जिल्ह्याला दलित अत्याचारग्रस्त जिल्हा जाहीर करण्याची मागणी आता होत आहे.