बीडमध्ये दलित मुलीवर सामूहिक बलात्कार
By Admin | Updated: November 21, 2014 02:20 IST2014-11-21T02:20:36+5:302014-11-21T02:20:36+5:30
शाळेच्या मध्यांतरात घराकडे जाणाऱ्या चौदा वर्षीय दलित मुलीला तिघांनी चारचाकी वाहनामध्ये जबरीने बसवून तिच्यावर सामूहिक बलात्कार केल्याची घटना

बीडमध्ये दलित मुलीवर सामूहिक बलात्कार
कडा (जि. बीड) : शाळेच्या मध्यांतरात घराकडे जाणाऱ्या चौदा वर्षीय दलित मुलीला तिघांनी चारचाकी वाहनामध्ये जबरीने बसवून तिच्यावर सामूहिक बलात्कार केल्याची घटना आष्टी तालुक्यातील खडकत येथे बुधवारी दुपारी घडली. या प्रकरणी जिशान शब्बीर कुरेशी, शाकिर उर्फ डॉन शब्बीर सय्यद व सोहेब ताहेर कुरेशी या तिघांना अटक करण्यात आली आहे.
पिडीत मुलगी रामचंद धस विद्यालयात इयत्ता नववीत शिकते. बुधवारी दुपारी दोन वाजता शाळेच्या मध्यांतरात ती घरी जेवण्यास जात असताना उपरोक्त तिघांनी तिला जबरीने आपल्या वाहनात बसविले. चाकूच्या धाकाने तिघांनी तिच्यावर चालत्या वाहनातच बलात्कार केला. रात्री आठच्या सुमारास एका विटभट्टीजवळ तिला सोडून आरोपी फरार झाले. विटभट्टी चालकाने तिच्याकडे विचारणा केली असता हा धक्कादायक प्रकार उघडकीस आला. त्याने मुलीच्या आई-वडीलांच्या मोबाईलवर संपर्क साधून सर्व माहिती दिली. तपासाची चक्रे तात्काळ फिरवत सर्व आरोपींना अटक केली.