धाकलू पाटीलचा अटकपूर्व जामीन अर्ज फेटाळला

By Admin | Updated: March 23, 2017 02:55 IST2017-03-23T02:55:36+5:302017-03-23T02:55:36+5:30

सैन्य भरती घोटाळ्याचा मुख्य सूत्रधार असलेल्या धाकलू पाटील याचा अटकपूर्व जामीन अर्ज बुधवारी विशेष ठाणे जिल्हा सत्र न्यायालयाने फेटाळला.

Dakalu Patil's anticipatory bail application is rejected | धाकलू पाटीलचा अटकपूर्व जामीन अर्ज फेटाळला

धाकलू पाटीलचा अटकपूर्व जामीन अर्ज फेटाळला

ठाणे : सैन्य भरती घोटाळ्याचा मुख्य सूत्रधार असलेल्या धाकलू पाटील याचा अटकपूर्व जामीन अर्ज बुधवारी विशेष ठाणे जिल्हा सत्र न्यायालयाने फेटाळला.
ठाणे शहर पोलिसांच्या गुन्हे शाखा-१ ने २५ फेब्रुवारी रोजी पुणे, नागपूर आणि गोव्यात छापा टाकून सैन्य भरती घोटाळा उघडकीस आणला. या प्रकरणाच्या तपासात धाकलू पाटील यांचे नाव पुढे आले होते. १७ मार्च रोजी पाटील याने विशेष ठाणे जिल्हा सत्र न्यायालयात अटकपूर्व जामीन अर्ज केला होता. त्यानुसार, त्याची सुनावणी २० मार्च रोजी होती. मात्र, त्या दिवशी सुनावणी न झाल्याने ही सुनावणी बुधवारी विशेष जिल्हा सत्र न्यायालयाचे न्यायाधीश करमरकर यांच्यासमोर झाली. त्या वेळी पाटीलचा अर्ज फेटाळला.(प्रतिनिधी)

Web Title: Dakalu Patil's anticipatory bail application is rejected