विठ्ठलाची नित्यपूजा ५१ हजारांत
By Admin | Updated: January 31, 2015 05:09 IST2015-01-31T05:09:11+5:302015-01-31T05:09:11+5:30
कर कटेवर ठेवून युगे अठ्ठावीस विटेवर उभा असलेला सावळ्या पांडुरंगाची नित्यपूजा करण्यासाठी भाविकांना आता ५१ हजार रुपये द्यावे लागणार आहेत

विठ्ठलाची नित्यपूजा ५१ हजारांत
पंढरपूर : कर कटेवर ठेवून युगे अठ्ठावीस विटेवर उभा असलेला सावळ्या पांडुरंगाची नित्यपूजा करण्यासाठी भाविकांना आता ५१ हजार रुपये द्यावे लागणार आहेत. पुरातत्त्व विभागाकडून महापूजा बंद करण्यात आल्याने उत्पन्नाच्या दृष्टीने आतापर्यंत मोफत असलेल्या या नित्यपूजेसाठी पैसे घेण्याचा निर्णय मंदिर समितीने घेतला आहे.
मंदिर समितीचे अध्यक्ष अण्णा डांगे यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या बैठकीत हा निर्णय घेण्यात आला. नित्यपूजेला देणगीदार शोधायचा आणि ५१ हजार रुपये घेऊन ही पूजा करायची, याबाबतचा निर्णय २१ आॅगस्ट २०१४ रोजीच्या बैठकीत घेण्यात आला होता.
शुक्रवारी झालेल्या बैठकीत येत्या १९ फेब्रुवारीपासून याची अंमलबजावणी करण्याचे ठरविण्यात आले. इच्छुक देणगीदारासोबत त्या दिवशी रांगेतील एका भाविक पती-पत्नीला या पूजेचा मान देण्याचाही निर्णय समितीने घेतला आहे.