डहाणूत तीन खून

By Admin | Updated: May 24, 2017 03:00 IST2017-05-24T03:00:23+5:302017-05-24T03:00:23+5:30

चिंचणी वाणगांव नाका येथे चायनीजचे हॉटेल चालविणाऱ्या नागेश गोवंडर (४५) याने पत्नी मधी (३८) हिचा चारित्र्याच्या

Dahunaut three murders | डहाणूत तीन खून

डहाणूत तीन खून

लोकमत न्यूज नेटवर्क
डहाणू : चिंचणी वाणगांव नाका येथे चायनीजचे हॉटेल चालविणाऱ्या नागेश गोवंडर (४५) याने पत्नी मधी (३८) हिचा चारित्र्याच्या संशयावरून रात्री धारदार हत्याराने डोक्यात वार करून खून केला. तसेच आशागड येथे एका मुलाने आपल्या बापाचा तर कंक्राडी येथे बहिणीला मारहाण करणाऱ्या भाऊजीचा खून भावाने केला आहे. वरील गुन्ह्यातील आरोपींना अटक करून त्यांची रवानगी पोलीस कोठडीत करण्यात आली आहे.
नागेशचे मधीबरोबर रात्री कडाक्याचे भांडण झाले होते. त्याचा राग आणि तिच्या चारित्र्याबद्दलचा संशय यामुळे त्याने झोपलेल्या मधीचा धारदार हत्याराने डोक्यात वार करून खून केला. तिचा मृतदेह बाथरूमजवळ नेऊन ठेवला व ती पाय घसरून पडून डोके फुटल्याने तिचा मृत्यू झाल्याचे भासविले. मात्र पोलीस निरीक्षक अरुण फेगडे यांना संशय आल्याने त्यांनी नागेशची चौकशी केली असता त्याने खून केल्याची कबुली दिली. त्याला २४ मेपर्यंत पोलीस कोठडी देण्यात आली आहे.
कंक्राडी येथे बहिणीला मारहाण करणाऱ्या वसंत झोप या भाऊजीचा त्याचा मेहुणा लहानू दळवी याने लाकडी दांडक्याने मारहाण करून खून केला. जखमी अवस्थेत झोप यांना उपजिल्हा रुग्णालयात दाखल केले असता उपचारादरम्यान त्यांचा मृत्यू झाला.
अशागड येथे घरात सातत्याने भांडण करणाऱ्या गणपत मोर या पित्याचा दिलीप (१९) याने कुऱ्हाडीचे घाव घालून खून केला. हे आरोपी पळून जाण्याच्या तयारीत असताना निरीक्षक सुदाम शिंदे यांनी दोन तासांतच त्यांना अटक केली.

Web Title: Dahunaut three murders