दहिहांडा फाट्यावर बसच्या धडकेत वृद्ध ठार

By Admin | Updated: July 10, 2015 01:23 IST2015-07-10T01:23:45+5:302015-07-10T01:23:45+5:30

अकोट तालुक्यातील घटना.

Dahihanda fate kills the old man in the bus | दहिहांडा फाट्यावर बसच्या धडकेत वृद्ध ठार

दहिहांडा फाट्यावर बसच्या धडकेत वृद्ध ठार

दहिहंडा (जि. अकोला ): एसटी बसने धडक दिल्याने वृद्ध ठार झाल्याची घटना गुरुवारी सकाळी दहिहंडा फाट्यावर धडली. आकोट तालुक्यातील तरोडा येथील सेवकराम वानखडे (६५) किनखेड येथे आपल्या नातेवाइकांकडे आले होते. ते सकाळी तिरोडा येथे परत जाण्यासाठी सकाळी ११.३0 वाजताच्या सुमारास दहिहांडा फाट्यावर आले. फाट्यावर एम.एच-40-8478 या क्रमांची एसटी बस आली. ते उपस्थित इतरही प्रवाशांसह बसमध्ये चढत होते. तेवढय़ात चालकाने बस पुढे नेण्यास सुरुवात केली. सेवकराम वानखडे बसमध्ये चढू शकले नाहीत. ते बसच्या मागील चाकांमध्ये सापडले. त्यातच त्यांचा मृत्यू झाला. त्यांचा मुलगा दिनेश गौतम वानखडे यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार दहीहांडा पोलिसांनी बसचालक संजय गुणवंतराव भिलवार ( वय. ४२ रा. चांदूर बाजार, जि. अमरावती.) विरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला.

Web Title: Dahihanda fate kills the old man in the bus