डहाणूतील विद्यार्थ्याची मुंबईत आत्महत्या

By Admin | Updated: May 2, 2017 04:07 IST2017-05-02T04:07:53+5:302017-05-02T04:07:53+5:30

डहाणू तालुक्यातील नरपड गावच्या विकी भगवान सुरती (१९) या विद्यार्थ्याने शुक्रवारी (२८ एप्रिल) मालाड येथील

Dahanu's student suicides in Mumbai | डहाणूतील विद्यार्थ्याची मुंबईत आत्महत्या

डहाणूतील विद्यार्थ्याची मुंबईत आत्महत्या

बोर्डी : डहाणू तालुक्यातील नरपड गावच्या विकी भगवान सुरती (१९) या विद्यार्थ्याने शुक्रवारी (२८ एप्रिल) मालाड येथील वसतिगृहामध्ये आत्महत्या केली. पालकांनी या प्रकरणी घातपाताचा संशय व्यक्त करून, चौकशीची मागणी केली आहे. दरम्यान, पोलिसांनी विकीचा मोबाइल तपासासाठी जमा केला असून, शवविच्छेदन अहवाल प्राप्त झाल्यावर तपासाची दिशा स्पष्ट होणार आहे.
विकी मुंबईतील पद्मभूषण वसंतदादा पाटील प्रतिष्ठानच्या मनोहर फाळके पॉलिटेक्निक, सायन येथे सॉफ्टवेअर इंजिनीअरिंगच्या दुसऱ्या वर्षात शिकत होता.
डहाणू येथून जाणे-येणे शक्य नसल्याने, तो मालाड पूर्व येथील श्री मायावंशी शिक्षण प्रसारक संघ, कैलासपुरी, अप्पर गोविंदनगर येथील वसतिगृहामध्ये राहत होता. (वार्ताहर)

Web Title: Dahanu's student suicides in Mumbai