डहाणूत मालगाडीचे डबे रुळावरुन घसरले, लोकल सुरळीत
By Admin | Updated: July 4, 2016 08:06 IST2016-07-04T07:11:47+5:302016-07-04T08:06:36+5:30
डहाणूत वाणगावदरम्यान मालगाडीचे 11 डबे रुळावरुन घसरल्याने मुंबईहून गुजरातकडे जाणा-या गाड्या रद्द करण्यात आल्या आहेत, लोकल सुरळीत चालू आहेत.

डहाणूत मालगाडीचे डबे रुळावरुन घसरले, लोकल सुरळीत
>ऑनलाइन लोकमत -
मुंबई, दि. 04 - डहाणूत वाणगावदरम्यान मालगाडीचे 11 डबे रुळावरुन घसरले आहेत. डहाणू रोडच्या डाऊन लाइनवर मध्यरात्रीच्या दरम्यान 11 डब्यांची कोनराज कंटेनर ट्रेन रुळावरून घसरली. या दुर्घटनेत कोणतीही जिवीतहानी झालेली नाही. मालगाडीचे डबे घसरल्याने मुंबईहून गुजरातकडे जाणा-या गाड्या रद्द करण्यात आल्या आहेत. लांब पल्ल्याच्या गाड्यांवर जरी परिणाम झाला असला तरी लोकल सेवेवर काहीच परिणाम झाला नसून लोकल सुरळीत चालू आहेत.