डहाणू-बोर्डीमार्गाची चाळण
By Admin | Updated: October 20, 2016 03:40 IST2016-10-20T03:40:05+5:302016-10-20T03:40:05+5:30
महाराष्ट्र गुजरात सीमा भागातील किनाऱ्यालगत गावांमधील रस्ते खड्डेमय झाल्याने आदिवासींच्या विकासाचा मार्ग खुंटला आहे.

डहाणू-बोर्डीमार्गाची चाळण
अनिरुद्ध पाटील,
डहाणू/बोर्डी- महाराष्ट्र गुजरात सीमा भागातील किनाऱ्यालगत गावांमधील रस्ते खड्डेमय झाल्याने आदिवासींच्या विकासाचा मार्ग खुंटला आहे. ठेकेदारांचे निकृष्ठ काम, अवैध व क्षमतेपेक्षा अवजड वाहतूक, परिवहन आणि पोलीस विभागाचे दुर्लक्ष या मुळे परिस्थिती अधिक धोकादायक बनली आहे. या बाबत नागरिकांमध्ये तीव्र संताप असून आमदार पास्कल धणारे यांनी कारवाईचा इशारा दिला आहे.
झाई ग्रामपंचायतीने तलासरी सार्वजनिक विभागाकडे लिखित तक्र ार दिल्यानंतर खड्डे बुजवण्याचे काम हाती घेतले आहे. तथापि या ठेकेदाराविरुद्ध फसवणुक व फौजदारीचा गुन्हा नोंदवण्यासह काळ्या यादीत टाकण्याची मागणी नागरिकांनी केली आहे. तर डहाणू बोर्डी या प्रमुख राज्य मार्गाची चाळण होऊन अपघातसदृश्य स्थिती बनली आहे. झाई आणि खुटखाडी पूलाची पुन:बांधणी अत्यावश्यक बनले आहे. अनेक ग्रामपंचायतींनी पावसाळ्यात रस्ते दुरु स्तीवर हजारोंचा केलेला खर्च पाण्यात गेला आहे. चिखले गावातील पश्चिम रेल्वेच्या ६० क्रमांकाच्या गेट पासून नारळीपाड्यापर्यंत रस्त्याचे बांधकाम निकृष्ट दर्जाचे आहे. शासनाचे रस्ते विषयक धोरण आदिवासींना विकासाच्या प्रवाहाकडे आणणारे आहे. मात्र ठेकेदारांचे निकृष्ट काम स्थानिकांची प्रगती रोखणारे ठरत आहे. निकृष्ट रस्ते, अवैध व क्षमतेपेक्षा अवजड वाहतूक, परिवहन आणि पोलीस विभागाचे दुर्लक्ष इ.मुळे परिस्थिति धोकादायक बनली आहे.
>सहा महिन्यांपूर्वी बांधला रस्ता
दुर्गम भागातील उपेक्षित आदिवासी गावांना विकासाच्या प्रवाहात आणण्यासाठी शासनाच्या विविध विभागांकडून रस्त्यांची निर्मिती केली जाते. मात्र ठेकेदारांनी रस्त्यांचे निकृष्ट बांधकाम केल्याचे उघड झाले आहे. झाई ते बोरिगाव हा सहा महिन्यापूर्वी उभारलेला रस्ता खड्डेमय बनला आहे.
>दरम्यान रस्त्याच्या दुरावस्थेस कंत्राटदार कारणीभूत असल्याची तक्रार सातत्याने केली जात आहे. संबंधित विभागाकडून रस्त्याच्या गुणवत्तेची पडताळणी करून वेळप्रसंगी संबंधित ठेकेदारावर गुन्हा दाखल करण्यात येईल.’’
- पास्कल धणारे , आमदार, डहाणू विधानसभा मतदार संघ)