दादूने झिडकारला राजाचा प्रस्ताव

By Admin | Updated: January 30, 2017 16:35 IST2017-01-30T16:11:33+5:302017-01-30T16:35:53+5:30

मनसेचे नेते बाळा नांदगावकर युतीचा प्रस्ताव घेऊन रविवारी मातोश्रीवर गेले होते. त्यांनी शिवसेना नेत्यांशी चर्चाही केली.

Dadu has proposed Zidkala King's offer | दादूने झिडकारला राजाचा प्रस्ताव

दादूने झिडकारला राजाचा प्रस्ताव

ऑनलाइन लोकमत 

मुंबई, दि. 30 - आगामी मुंबई महापालिका निवडणुकीसाठी मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी टाळीसाठी पुढे केलेला हात उद्धव ठाकरे यांनी झिडकारला आहे. मनसेचे नेते बाळा नांदगावकर युतीचा प्रस्ताव घेऊन रविवारी मातोश्रीवर गेले होते. त्यांनी शिवसेना नेत्यांशी चर्चाही केली. 
 
पण आपल्यापर्यंत युतीचा प्रस्ताव आलेलाच नाही, आपण कोणाशीही युती करणार नाही असे उद्धव यांनी सांगितले. आपण पूर्ण सामर्थ्याने मैदानात उतरलो असून मुंबई महापालिकेवर भगवा फडकवल्याशिवाय राहणार नाही असे उद्धव यांनी सांगितले. 
महापालिका निवडणुकीसाठी शिवसेना-भाजपा युती तुटल्यानंतर मनसेने शिवसेनेला युतीचा प्रस्ताव दिला होता. मनसेने यासाठी कुठलीही अटही ठेवली नव्हती अशी माहिती आहे. ही युती झाली तर, मराठी मतांचे विभाजन टळेल त्यामुळे ही युती व्हावी अशी शिवसेना नेते मनोहर जोशींसह मराठीजनांची इच्छा होती पण उद्धव यांनी युती न करण्याची भूमिका घेतली आहे. 

Web Title: Dadu has proposed Zidkala King's offer

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.