‘दादर स्थानकाचे नामांतर नाही’

By Admin | Updated: March 31, 2015 04:02 IST2015-03-31T04:02:43+5:302015-03-31T04:02:43+5:30

दादर रेल्वेस्थानकाचे चैत्यभूमी नामांतर करण्याची बाब सर्वस्वी रेल्वे आणि केंद्राच्या अखत्यारीतील बाब आहे. गाव अथवा शहरांच्या नामांतराबाबत केंद्र सरकारने

'Dadar station is not named' | ‘दादर स्थानकाचे नामांतर नाही’

‘दादर स्थानकाचे नामांतर नाही’

मुंबई : दादर रेल्वेस्थानकाचे चैत्यभूमी नामांतर करण्याची बाब सर्वस्वी रेल्वे आणि केंद्राच्या अखत्यारीतील बाब आहे. गाव अथवा शहरांच्या नामांतराबाबत केंद्र सरकारने आखून दिलेल्या मार्गदर्शक तत्त्वांशी नामांतर सुसंगत नसल्याचे परिवहन मंत्री दिवाकर रावते यांनी विधान परिषदेत स्पष्ट केले.
राष्ट्रवादीचे सदस्य प्रकाश गजभिये यांच्या नियम ९३ अन्वये उपस्थित सूचनेवर मंत्री बोलत होते. गावांची आणि शहरांच्या नामांतराबाबत केंद्रीय गृहमंत्रालयाने १९५३ साली मार्गदर्शक तत्त्वे आखून दिली आहेत. ही तत्त्वे १९६०च्या परिपत्रकानुसार रेल्वे स्थानकांनाही लागू झाली. नामांतरात राज्य सरकारला विशेष अधिकार नाहीत. दादरचे नामांतर मार्गदर्शकांशी सुसंगत नसल्याचे रावते यांनी स्पष्ट केले.

Web Title: 'Dadar station is not named'

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.