दादर शिवाजीपार्कमध्ये महिला पोलिसाला शिविगाळ
By Admin | Updated: September 11, 2016 14:05 IST2016-09-11T14:05:44+5:302016-09-11T14:05:44+5:30
शनिवारी रात्री एका महिला पोलिसांला मद्यधुंद टवाळखोरांनी शिविगाळ केल्याची घटना समोर आली आहे.

दादर शिवाजीपार्कमध्ये महिला पोलिसाला शिविगाळ
ऑनलाइन लोकमत
मुंबई, दि. ११ - पोलिसांवरील हल्ल्याच्या घटना दिवसेंदिवस वाढत चालल्या आहेत. मागच्या आठवडयात विलेपार्ल्यामध्ये महिलेनेच महिला पोलिसाला मारहाण केल्याची घटना ताजी असताना आता शनिवारी रात्री एका महिला पोलिसांला मद्यधुंद टवाळखोरांनी शिविगाळ केल्याची घटना समोर आली आहे.
शनिवारी रात्री संबंधित महिला पोलिस कर्मचारी गौरी-गणपती विसर्जन असल्याने दादर शिवाजीपार्क चौपाटीवर बंदोबस्तावर तैनात होती. त्यावेळी संतोष गौडर,विनोदकुमार पारशी व गजानन पकाळे या तिघांनी महिला पोलिसाला शिविगाळ केली. शिवाजी पार्क पोलिसांनी तिघांना अटक केली आहे. रात्री अकरा ते साडेअकराच्या दरम्यान ही घटना घडली.