दादर-औरंगाबाद एसी शिवनेरी

By Admin | Updated: October 31, 2015 01:39 IST2015-10-31T01:39:57+5:302015-10-31T01:39:57+5:30

औरंगाबाद आणि अहमदनगर शहरांतील प्रवाशांची मागणी विचारात घेऊन एसटी महामंडळाने दादर ते औरंगाबाद मार्गावर २ शिवनेरी सेवा सुरू करण्याचा निर्णय घेतला आहे.

Dadar-Aurangabad AC Shivneri | दादर-औरंगाबाद एसी शिवनेरी

दादर-औरंगाबाद एसी शिवनेरी

मुंबई : औरंगाबाद आणि अहमदनगर शहरांतील प्रवाशांची मागणी विचारात घेऊन एसटी महामंडळाने दादर ते औरंगाबाद मार्गावर २ शिवनेरी सेवा सुरू करण्याचा निर्णय घेतला आहे. दादर ते औरंगाबाद आणि दादर ते अहमदनगर अशा २ सेवा १ नोव्हेंबरपासून सुरू होतील, अशी माहिती एसटी महामंडळाकडून देण्यात आली.
दादर येथून सकाळी साडे पाच आणि साडे सहा वाजता सुटणाऱ्या या बसेस ३८६ किलोमीटरचा प्रवास मैत्रीपार्क, वाशी हायवे, शिवाजीनगर, अहमदनगर मार्गे पूर्ण करून औरंगाबादला अनुक्रमे दुपारी सव्वा एक आणि दुपारी सव्वा दोन वाजता पोहोचतील. परतीच्या प्रवासासाठी औरंगाबादहून दुपारी २.३0 आणि ३.३0 वाजता बस सुटून अहमदनगर, पुणे स्टेशनमार्गे रात्री अनुक्रमे सव्वा दहा आणि सव्वा अकरा वाजता पोहोचतील.

Web Title: Dadar-Aurangabad AC Shivneri

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.