‘नेकी’ला दादा कोंडके स्मृती करंडक
By Admin | Updated: May 8, 2017 03:34 IST2017-05-08T03:34:27+5:302017-05-08T03:34:27+5:30
दादा कोंडके करंडक एकांकिका स्पर्धेत शुभंकर वाघोले आणि ग्रुपच्या ‘नेकी’ या एकांकिकेने प्रथम पारितोषिक पटकावले. संघाला शाहीर

‘नेकी’ला दादा कोंडके स्मृती करंडक
लोकमत न्यूज नेटवर्क
पुणे : दादा कोंडके करंडक एकांकिका स्पर्धेत शुभंकर वाघोले आणि ग्रुपच्या ‘नेकी’ या एकांकिकेने प्रथम पारितोषिक पटकावले. संघाला शाहीर दादा कोंडके स्मृती फिरता करंडक आणि १५ हजार रुपयांचे पारितोषिक मिळाले.
सार्थ अॅकॅडमीच्या ‘सेकंड हॅँड’ला द्वितीय क्रमांकाचा गजाननराव शिर्के स्मृतिचषक आणि १२ हजार रुपयांचे, तर एलएलकेएलपी प्रॉडक्शनच्या ‘आंबटगोड’ला चित्रतपस्वी भालजी पेंढारकर दीपकराज चषक आणि ७ हजार ७७७ रुपयांचे उत्तेजनार्थ पारितोषिक मिळाले. एकपात्री स्पर्धेत भावना प्रसादेला प्रथम क्रमांकाचा शिवभक्त साबीरभाई शेख एकपात्री चषक आणि ७ हजार रुपयांचे पारितोषिक मिळाले.
शाहीर दादा कोंडके प्रतिष्ठान, अखिल भारतीय चित्रपट महामंडळ आणि आम्ही एकपात्री या संस्थांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित दादा कोंडके करंडक एकांकिका आणि एकपात्री स्पर्धांचे आयोजन करण्यात आले होते. यशवंतराव चव्हाण नाट्यगृह येथे या पाचदिवसीय राज्यस्तरीय स्पर्धा झाल्या.
स्पर्धेचा पारितोषिक वितरण समारंभ ‘बाहुबली’चे रंगभूषाकार प्रताप बोराडे, हेमंत बिरजे, अभिनेते राहुल सोलापूरकर, अभिनेते राघवेंद्र कडकोळ, ज्येष्ठ अभिनेत्री लीला गांधी, आशा काळे, बाळ मोहिते, सुधीर गाडगीळ, जयमाला इनामदार, नंदिनी जोग यांच्या उपस्थितीत
झाला.
सविस्तर निकाल
एकांकिका स्पर्धा
दिग्दर्शक शुभंकर वाघोले,
स३रज गडगिले (नेकी)
लेखक इरफान मुजावर (नेकी)
नेपथ्य संतोष चंदनशिवे
(रामराम पावणं)
प्रकाशयोजना गौरव जोशी (नेकी)
उत्कृष्ट संगीत अभिषेक अवचट (अशी ही प्रसववेदना)
उत्कृष्ट अभिनेता - सागर पवार (गण्या)
उत्कृष्ट अभिनेत्री देवयानी मोरे (प्रेरणा)
विनोदी कलाकार राहॅल बेलापूरकर - (भीमा)
बालकलाकार वैशाली भागवत सूर्यवंशी (शालू, आंबटगोड)
एकपात्री स्पर्धा
द्वितीय देवीप्रसाद सोहोनी.
तृतीय प्रियांका गोगटे
उत्तेजनार्थ मृदुला मोघे, कल्पना शिरोडे, राहुल कालेल.
बालकलाकार - प्रथम देवांग जोशी, द्वितीय पुष्कराज सैद, तृतीय क्रिश मेहता.