नागपुरात मण्णपूरम गोल्डवर दरोडा

By Admin | Updated: September 28, 2016 21:56 IST2016-09-28T21:56:23+5:302016-09-28T21:56:23+5:30

दरोडेखोरांनी मण्णपूरम गोल्ड फायनान्स कंपनीच्या कार्यालयातून ३१ किलो ७४१ ग्राम सोन्याचे दागिने लुटून नेले.

Dacoity at Mannapuram Gold in Nagpur | नागपुरात मण्णपूरम गोल्डवर दरोडा

नागपुरात मण्णपूरम गोल्डवर दरोडा

ऑनलाइन लोकमत

नागपूर, दि. 28 - उत्तर नागपुरातील जरीपटका परिसरात दिवसाढवळ्या शस्त्रांनी सज्ज असलेल्या दरोडेखोरांनी मण्णपूरम गोल्ड फायनान्स कंपनीच्या कार्यालयातून ३१ किलो ७४१ ग्राम सोन्याचे दागिने लुटून नेले. आजच्या बाजारभावानुसार या सोने व दागिन्यांची किंमत १० कोटी इतकी आहे. ही घटना येथील सीसीटीव्हीत कैद झाली आहे.

जरीपटका मुख्य मार्गावरील भीम चौकात कुकरेजा कॉम्प्लेक्स आहे. या इमारतीच्या पहिल्या माळ्यावर मणप्पुरम गोल्डचे कार्यालय आहे. येथे नागरिकांना दागिने गहाण ठेवून कर्ज दिले जाते. बुधवारी दुपारी ४.१५ वाजता कार्यालयात तीन कर्मचारी व सहा ग्राहक हजर होते. कार्यालयाचे चॅनल गेट नेहमी लागून असते.

ग्राहकांनी बेल वाजवल्यावरच ते उघडले जाते. एका युवकाने बेल वाजवताच महिला कर्मचाऱ्याने गेट उघडण्यापूर्वी तोंडावरील रुमाल हटवण्यास सांगितले. रुमाल हटवताच महिलेने गेट उघडले. त्याच्या मागेच दुसरा साथीदारही आला. महिला कर्मचारी काही समजण्यापूर्वीच एकूण सहा दरोडेखोर आत शिरले.

Web Title: Dacoity at Mannapuram Gold in Nagpur

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.