दाभोलकर, पानसरेंची हत्या करणा-या गोडसेंच्या वारसदार प्रवृत्तीचा निषेध - श्रीपाल सबनीस
By Admin | Updated: January 16, 2016 14:55 IST2016-01-16T14:55:48+5:302016-01-16T14:55:48+5:30
नरेंद्र दाभोलकर, गोविंद पानसरे व कलबुर्गी यांची हत्या नथुराम गोडसेच्या वारसदारां प्रवृत्तींनी केली असून या ह्त्यांचा मी तीव्र शब्दात निषेध करतो

दाभोलकर, पानसरेंची हत्या करणा-या गोडसेंच्या वारसदार प्रवृत्तीचा निषेध - श्रीपाल सबनीस
>ऑनलाइन लोकमत
ग्यानबा तुकाराम नगरी (पिंपरी चिंचवड) दि. १६ - नरेंद्र दाभोलकर, गोविंद पानसरे व कलबुर्गी यांची हत्या नथुराम गोडसेच्या वारसदारां प्रवृत्तींनी केली असून या ह्त्यांचा मी तीव्र शब्दात निषेध करतो असे ८९व्या मराठी साहित्य संमेलनाचे अध्यक्ष श्रीपाल सबनीस यांनी सांगितले. प्रदीर्घ भाषण पुस्तक स्वरुपात प्रसिद्ध करण्यात आल्याचेही ते म्हणाले, व त्यांनी छोटेखानी उत्स्फूर्त भाषण यावेळी केले.
सबनीस यांच्या ताज्या वक्तव्यांवर टीकेची झोड उठली होती, काही प्रसारमाध्यमांनीही त्यांना लक्ष्य केले होते. याचा संदर्भ देताना प्रसारमाध्यमे ही लोकशाहीचा चौथा खांब मानली जातात, परंतु हीच प्रसारमाध्यमे तिरडीची ताटी होतात की काय असं वाटावं अशी स्थिती असल्याचंही मत खेदानं व्यक्त केलं.
सबनीस यांच्या भाषणातील मुख्य मुद्दे:
-
- जात संपल्यावर तटस्थ इतिहास लिहिता येतो.
- राज्य व देश सहिष्णू असल्याचं सांगत श्रीपाल सबनीसांनी साहित्य हे अभिजनांप्रमाणेच बहुजनांचंही
- सगळे ब्राह्मण गोडसे असतात का, असं विचारत वैचारिक मर्यादा न घालण्याचं आवाहन श्रीपाल सबनीसांनी केलं आहे.
- सत्तेच्या सोयीनुसार सत्य साहित्यिकांच्या तोंडी येईल अशी अपेक्षा राजकीय नेत्यांनी बाळगू नये.
- शिवाजी महाराजांचं राज्य जातिधर्म निरपेक्ष होतं. आपण कधी शिवाजी महाराजांना ब्राह्मणाविरोधात उभं केलं, कधी मराठ्यांविरोधात उभं केलं, कधी मुसलमानांविरोधात उभं केलं, ही दुर्दैवी बाब आहे.
- अध्यक्षपदाच्या निवडीवरून मला विरोधकांनी प्रचंड घेरलं.
- संतांच्या वाटणीमुळे महाराष्ट्राचं वाटोळं झालं.
- देवेंद्र फडणवीस यांच्या रुपाने महाराष्ट्राला अत्यंत बुद्धीवादी, प्रामाणिक व हुषार मुख्यमंत्री लाभला आहे.
- डॉ. नरेंद्र दाभोलकर, गोविंद पानसरे आणि कलबुर्गींची हत्या नथुराम गोडसेंच्या वारसदारांनी केल्याचे सांगत अशा प्रवृत्तींचा निषेध साहित्य संमेलनाध्यक्ष श्रीपाल सबनीस यांनी अध्यक्षीय भाषण करताना केला.