डबेवाले करणार दुष्काळग्रस्तांना मदत!
By Admin | Updated: September 20, 2015 00:41 IST2015-09-20T00:41:30+5:302015-09-20T00:41:30+5:30
महाराष्ट्रातील दुष्काळग्रस्तांना सर्व स्तरांतून मदत होत असताना आता मुंबईचे डबेवाल्यांनी पुढाकार घेत दुष्काळग्रस्तांना आधार देण्याचा निर्धार केला आहे. दुष्काळग्रस्तांना ‘फराळा’चे

डबेवाले करणार दुष्काळग्रस्तांना मदत!
मुंबई : महाराष्ट्रातील दुष्काळग्रस्तांना सर्व स्तरांतून मदत होत असताना आता मुंबईचे डबेवाल्यांनी पुढाकार घेत दुष्काळग्रस्तांना आधार देण्याचा निर्धार केला आहे. दुष्काळग्रस्तांना ‘फराळा’चे वाटप करून साध्या पद्धतीने त्यांच्यासोबत डबेवाले दिवाळी साजरी करणार आहेत.
डबेवाले यंदाच्या दिवाळीत मराठवाड्यातील आत्महत्याग्रस्त कुटुंबीयांसोबत वेळ घालविणार आहेत. डबेवाल्यांनी घरी तयार केलेले विविध पदार्थ त्या कुटुंबाला घेऊन जातील. शिवाय, त्या घरांतील महिलेला भाऊबीजेची भेटही देणार आहेत. ‘नाम फाउंडेशन’चे आवाहन डबेवाले आपल्या डबे पोहोचविण्याच्या सेवेतून सर्व ग्राहकांपर्यंतही पोहोचविणार आहेत. त्यासाठी त्या फाउंडेशनचा अकाउंट नंबर आणि सर्व माहिती प्रत्येक डब्यातून दिली जाईल, असे मुंबई जेवण डबे वाहतूक मंडळाचे प्रवक्ते सुभाष तळेकर यांनी सांगितले.