शहरं
Join us  
Trending Stories
1
"उद्या सुट्टी आहे, माझ्या अंत्ययात्रेला या"; पतीसाठी भावनिक चिठ्ठी लिहून विवाहितेने संपवलं जीवन!
2
बारामतीची लढत थांबणार? पोटनिवडणुकीत काँग्रेसने उमेदवारी मागे घेण्यासाठी ठेवली 'ही' अट!
3
सुरक्षित आणि करमुक्त गुंतवणुकीसाठी PPF उत्तम पर्याय; दरमहा ११,००० रुपयांच्या गुंतवणुकीवर मिळवा इतका परतावा
4
'तुमच्या तपस्येतच नाही तर फोटोशॉपमध्येही उणीव', हिमंता बिस्वा सरमांच्या पत्नीचा पवन खेडा यांना टोला
5
Crude Oil Price Hike: कच्च्या तेलाच्या किमतीत जोरदार तेजी; ट्रम्प यांच्या धमक्यांनी सातत्यानं बिघतंय सामान्यांचं बजेट
6
मुंबई पालिका क्षेत्रात महिलांकरता मोफत स्वच्छतागृहांच्या सुधारित धोरणासाठी प्रयत्नशील! - महापौर
7
आजचे राशीभविष्य, ०६ एप्रिल २०२६: घरात शांती व समाधानाचे वातावरण; अचानक पैसा खर्च होईल
8
भोंदू अशोक खरात प्रकरणाची EDमार्फत चौकशी; CDR प्रकरणातही मुख्यमंत्र्यांचे चौकशीचे आदेश
9
Gaurav More: 'हास्यजत्रा' फेम गौरव मोरेने गुपचुप केलं लग्न? ऋतुजा बागवे लिहिते- "Mr. & Mrs मोरे"
10
लेख: मुंबईकरांची लोकलराणी वारंवार का अडखळतेय? आजकाल धाप लागल्यासारखी करतेय...
11
होर्मुझ उघडा, अन्यथा तुम्ही नरकात सडाल! ट्रम्प यांची शिवराळ भाषेत इराणवर जबर हल्ल्याची धमकी
12
लेख: शिक्षिकेऐवजी नेत्याचा, पोलिसाचा मुलगा असता तर..? चार वर्षांच्या विघ्नेशची उपचारासाठी फरफट
13
विधानसभा निवडणुकीच्या रणधुमाळीत चार राज्यांमध्ये तब्बल ६५० कोटींची रोख रक्कम-मद्य जप्त
14
राज्याच्या अर्थ खात्यातील बडा मासा गळाला; सहा लाखांची लाच घेताना एसीबीने ठोकल्या बेड्या
15
पोहायला पाण्यात उतरा... पण तुमच्या जबाबदारीवर! तलावावर जीवरक्षक, दारात ॲम्ब्युलन्स तरीही मृत्यूच्या घटना
16
विशेष लेख: मृताच्या टाळूवरचे लोणी खाणाऱ्यांना अद्दल घडवा!
17
कंगाल पाकिस्तानात जनावरांवरही ‘गोबर टॅक्स’! आपल्याच देशातल्या गोरगरीबांनाही सोडलं नाही...
18
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
19
अग्रलेख: चलो, चांद के पार चलो...! ओरियन यानाचा नवा इतिहास, पण कहाणी सुफळ संपूर्ण नाही!
20
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
Daily Top 2Weekly Top 5

डी. एस. कुलकर्णींना तात्पुरता दिलासा, अटक न करण्याचे निर्देश : दोन महिन्यांत १५० कोटी देण्याची तयारी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 18, 2017 02:57 IST

पुण्यातील प्रसिद्ध बांधकाम व्यावसायिक डी. एस. कुलकर्णी व त्यांच्या पत्नीला उच्च न्यायालयाने २३ नोव्हेंबरपर्यंत तात्पुरता दिलासा देत २३ नोव्हेंबरपर्यंत अटक न करण्याचे निर्देश दिले आहेत.

मुंबई : पुण्यातील प्रसिद्ध बांधकाम व्यावसायिक डी. एस. कुलकर्णी व त्यांच्या पत्नीला उच्च न्यायालयाने २३ नोव्हेंबरपर्यंत तात्पुरता दिलासा देत २३ नोव्हेंबरपर्यंत अटक न करण्याचे निर्देश दिले आहेत. ठेवीदारांचे पैसे कसे व कधी परत करणार, अशी विचारणा कुलकर्णी यांच्याकडे गेल्या सुनावणीत उच्च न्यायालयाने केली होती. त्यावर दोन महिन्यांत १५० कोटी रुपये देण्याचे त्यांनी मान्य केलेआहे.२,७७४ ठेवीदारांचे २०० कोटींहून अधिक रुपये कुलकर्णी यांना परत करायचे आहेत. या ठेवीदारांची देणी थकविण्यात आल्याचा आरोप त्यांच्यावर आहे. पुणे सत्र न्यायालयाने डीएसके व त्यांच्या पत्नीचा अटकपूर्व जामीन अर्ज फेटाळल्यानंतर, डीएसके दाम्पत्याने उच्च न्यायालयातधाव घेतली.१० नोव्हेंबर रोजी न्यायालयाने त्यांना एका आठवड्याचा दिलासा दिला. त्याची मुदत शुक्रवारी संपत होती. न्यायालयाने २३ नोव्हेंबरपर्यंत त्यांना अटक न करण्याचा आदेश दिल्यामुळे डीएसके दाम्पत्याची अटक तूर्तास टळली आहे. त्यामुळे त्यांना या प्रकरणी तात्पुरता का होईना, पण दिलासा मिळाला आहे.दोन महिन्यांत १५० कोटी रुपये देण्याचे न्यायालयाला कुलकर्णी यांनी सांगितले आहे. परंतु लोक पैसे परत करण्याचे आश्वासन देतात. मात्र, त्या नंतर टाळाटाळ करतात, असा अनुभव आहे, असे न्या. अजय गडकरी यांनी या वेळी म्हटले.ठेवीदारांचे पैसे परत करण्याबाबत अन्य पर्यायांचा विचार करा. तुम्ही इतक्या वर्षांत कमावलेल्या प्रतिष्ठेबाबत आम्हाला काहीही देणे-घेणे नाही, असेही न्यायालयाने बजावले.पैसे परत करण्याबाबत भूमिका स्पष्ट करादोन महिने हा मोठा कालावधी असल्याचे न्या. अजय गडकरी यांनी म्हटले, तसेच याचिकाकर्त्यांनी ठेवीदारांचे पैसे परत करण्याबाबत भूमिका स्पष्ट करावी, अन्यथा अर्जावर सुनावणी घेण्यास सुरुवात करू, असेही बजावले आहे. डीएसकेंवर अनेक बँकांचे मिळून १,४०० कोटी रुपये कर्ज आहे.हे कर्ज त्यांनी मालमत्ता गहाण ठेवून घेतले होते. मात्र, आता याच मालमत्ता जप्त करून, संबंधित बँका कर्जाचे पैसे वसूल करण्याचा प्रयत्न करत आहेत. बालेवाडी आणि फुरसुंगीमधील जमीन सेंट्रल बँक आॅफ इंडियाने जप्त केली आहे. त्यापैकी फुरसुंगीमधील जमीन ही डीएसकेंच्या बहुचर्चित ड्रीम सिटीचा भाग आहे.

टॅग्स :D.S.Kulkarniडी.एस. कुलकर्णीCrimeगुन्हाPuneपुणे