शहरं
Join us  
Trending Stories
1
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
2
होर्मुझनंतर आता 'बाब अल-मंदेब'वर इराणची नजर? एका ट्विटने खळबळ; काय होणार परिणाम?
3
खळबळजनक! १२१ आक्षेपार्ह Video, २ पेनड्राईव्ह...; नोकरीचं आमिष दाखवून महिलांवर अत्याचार
4
डोनाल्ड ट्रम्प यांची सुट्टी रद्द! व्हाईट हाऊसमध्ये युद्धाची तयारी? इराणच्या एका चालीने अमेरिका हादरली!
5
बारामती पोटनिवडणूक बिनविरोध करण्यासाठी ठाकरे पाठिंबा देणार का? संजय राऊतांनी सगळेच सांगितले
6
Video: खळखळ वाहणारं नदीचं पाणी अचानक दगडांमध्ये झालं गायब? निसर्गाची ही किमया पाहिलीत?
7
Raghav Chadha : Video - “घायल हूं, इसलिए घातक हूं,...”; AAP च्या गंभीर आरोपावर राघव चड्ढा यांचं चोख प्रत्युत्तर
8
इराणने रस्ता रोखला, पण भारताने शोधली नवी वाट; आफ्रिकेतील देशांशी मैत्री अन् रशियाची तुफान साथ!
9
DC vs MI : मुंबई इंडियन्सचा कॅप्टन बदलला! पांड्याच्या जागी सूर्याकडे जबाबदारी, जाणून घ्या त्यामागचं कारण
10
Gold Silver Price: महिन्याभरात ३५ हजारांनी स्वस्त झाली चांदी, तर सोनं १२ हजारांनी घसरलं; पाहा काय आहेत नवे दर
11
भाजपाने तिकीट नाकारल्यानंतर अन्नामलाई पहिल्यांदाच बोलले, म्हणाले, ‘मला निवडणूक लढवायची…’ 
12
होर्मुज संकटामुळे पाकिस्तानचं कंबरडं मोडलं; 'पेट्रोल बॉम्ब' फुटला, जनताही रस्त्यावर
13
पत्नी प्रियकरासोबत फिरताना दिसली, जाब विचारताच झालं उलट! दोघांनी मिळून पतीला हाणलं
14
Hanuman Mantra: घराबाहेर पडताना, वाहन चालवताना ११ वेळा म्हणा 'हा' दिव्य सुरक्षा कवच मंत्र; हनुमान करतील रक्षण!
15
शेअर बाजारातील घसरणीमुळे गुंतवणूकदार हवालदिल; Zerodha च्या नितीन कामथ यांनी दिला नवा मंत्र
16
Video - हृदयद्रावक! नातू पार्क करत होता गाडी, तेवढ्यात बॅक गिअर; आजीचा जागीच मृत्यू,
17
राहुल गांधी एकाकी?, LPG मुद्द्यावर काँग्रेसमध्ये फूट पडल्याचं चित्र; नेते करताहेत PM मोदींचे कौतुक
18
सर्वसामान्यांना मोठा दिलासा! किरकोळ चुकांसाठी आता पोलीस कोठडी नाही; 'जन विश्वास' कायद्याने चित्र बदलले!
19
IPL 2026, DC v MI Head To Head Record : दिल्ली कॅपिटल्सपेक्षा मुंबई इंडियन्स भारी, पण...
20
Rupa Bayor : धाकड गर्ल! तायक्वांदो जागतिक क्रमवारीत टॉप-५ मध्ये झेप घेणारी रूपा बायोर पहिली भारतीय
Daily Top 2Weekly Top 5

डी. एस. कुलकर्णींच्या अटकपूर्व जामिनावर उद्याच होणार निर्णय

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 15, 2018 22:02 IST

पुण्यातील प्रसिद्ध बांधकाम व्यावसायिक डी. एस. कुलकर्णींच्या अडचणीत वाढ होणार आहे. डी. एस. कुलकर्णी यांची अटकपूर्व जामिनावर सुनावणी 22 फेब्रुवारी रोजी होणार होती. परंतु न्यायालयानं त्यांच्या जामीनअर्जावर उद्याच (16 फेब्रुवारी) सुनावणी करण्याचा निर्णय घेतला आहे.

मुंबई- पुण्यातील प्रसिद्ध बांधकाम व्यावसायिक डी. एस. कुलकर्णींच्या अडचणीत वाढ होणार आहे. डी. एस. कुलकर्णी यांच्या अटकपूर्व जामिनावर सुनावणी 22 फेब्रुवारी रोजी होणार होती. परंतु न्यायालयानं त्यांच्या जामीनअर्जावर उद्याच (16 फेब्रुवारी) सुनावणी करण्याचा निर्णय घेतला आहे. मुंबई उच्च न्यायालयातील डीएसकेंच्या अटकपूर्व जामीन अर्जावर दोन दिवसांपूर्वीच युक्तिवाद झाला होता.तेव्हा या खटल्यातील सुनावणी 22 फेब्रुवारीला घेण्याचे मुंबई उच्च न्यायालयानं ठरवलं होतं. परंतु आता उद्याच सुनावणी घेण्याचे निर्णय न्यायालयानं घेतला आहे. दोन दिवसांपूर्वीच्या सुनावणीत बांधकाम व्यावसायिक डी. एस. कुलकर्णी पुन्हा एकदा 50 कोटी भरण्यात अपयशी ठरले होते. डीएसकेंच्या जामीन अर्जावर मुंबई उच्च न्यायालयात सुनावणी आहे. सुनावणीवेळी डी. एस. कुलकर्णी यांनी लिलावासाठी 12 कोटींच्या संपत्तीची कागदपत्रं सादर केली होती. 12 कोटींची संपत्ती तातडीने ताब्यात घेण्याचा आदेश उच्च न्यायालयाने दिला होता. 22 फेब्रुवारीला मुंबई उच्च न्यायालय या खटल्यात सुनावणी घेणार होते. दरम्यान, बुलढाणा अर्बन मल्टिस्टेट को-ऑपरेटिव्ह बँकेने डी. एस. कुलकर्णी यांना 100 कोटींचं कर्ज देण्याची तयारी दर्शवली आहे. मात्र त्यासाठी डीएसकेंना 200 कोटींची संपत्ती तारण ठेवावी लागणार आहे.गेल्या सुनावणीवेळी बांधकाम व्यावसायिक डी. एस. कुलकर्णी यांना गुंतवणूकदारांचे ५० कोटी रुपये भरण्यासाठी अखेरची संधी देऊनही त्यांनी न्यायालयात रक्कम जमा न केल्याने उच्च न्यायालयाने संताप व्यक्त केला होता. भीक मागा, उधार घ्या; पण पुढील सुनावणीत रिकाम्या हाती येऊ नका, असे न्यायालयाने त्यांना सुनावले होते. पुढील सुनावणीत डीएसके दाम्पत्याला न्यायालयात हजर राहण्याचे निर्देश दिले होते. न्यायालयाने डीएसकेंसह पुणे आर्थिक गुन्हे अन्वेषण विभागालाही (ईओडब्ल्यू) चांगलेच धारेवर धरले होते. डीएसकेंच्या मालमत्ता लिलावात काढण्यास उशीर का केला जात आहे, असा प्रश्नही न्यायालयाने तपास यंत्रणेला केला होता.

टॅग्स :D.S.Kulkarniडी.एस. कुलकर्णी