डी. एल. एड. प्रवेश प्रक्रियेला हिरवी झेंडी

By Admin | Updated: July 18, 2016 20:37 IST2016-07-18T20:37:37+5:302016-07-18T20:37:37+5:30

मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाने सोमवारी प्राथमिक शिक्षण पदविका (डी.एल.एड. - डिप्लोमा इन इलेमेंट्री एज्युकेशन : पूर्वीचे डी. एड.) अभ्यासक्रमाची प्रवेश

D. L. Ed. Green flagrant in the admission process | डी. एल. एड. प्रवेश प्रक्रियेला हिरवी झेंडी

डी. एल. एड. प्रवेश प्रक्रियेला हिरवी झेंडी

ऑनलाइन लोकमत
नागपूर, दि १८ -  मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाने सोमवारी प्राथमिक शिक्षण पदविका (डी.एल.एड. - डिप्लोमा इन इलेमेंट्री एज्युकेशन : पूर्वीचे डी. एड.) अभ्यासक्रमाची प्रवेश प्रक्रिया राबविण्यास हिरवी झेंडी दाखवली. यामुळे विद्यार्थी व शिक्षण महाविद्यालयांना मोठा दिलासा मिळाला. ते अनेक दिवसांपासून या आदेशाची प्रतीक्षा करीत होते.
डी.एल.एड. अभ्यासक्रमाच्या प्रवेश प्रक्रियेची जाहीरात देताना त्यामध्ये हा अभ्यासक्रम केल्यानंतर नोकरी मिळण्याची कोणतीही खात्री नाही अशी सूचना टाकण्यात यावी असे निर्देश शालेय शिक्षण विभागाने दिले होते. यासंदर्भात २६ एप्रिल २०१६ रोजी परिपत्रक जारी करण्यात आले होते. न्यायालयाने ८ जून २०१६ रोजी प्रकरणावरील पहिल्याच सुनावणीनंतर परिपत्रकावर स्थगिती दिली. तेव्हापासून प्रवेश प्रक्रिया थांबविण्यात आली होती. या वादग्रस्त परिपत्रकाविरुद्ध सावनेर येथील श्रीकृष्ण अध्यापक विद्यालयासह एकूण ११ महाविद्यालयांनी उच्च न्यायालयात रिट याचिका दाखल केली आहे. याचिकाकर्त्यांतर्फे अ‍ॅड. प्रशांत शेंडे यांनी बाजू मांडली. परिपत्रक जारी केल्यामुळे महाविद्यालयांच्या संकटात भर पडली असे याचिकाकर्त्यांचे म्हणणे आहे.

Web Title: D. L. Ed. Green flagrant in the admission process

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.