शहरं
Join us  
Trending Stories
1
"काँग्रेसचे १५ खासदार विकले गेले, मुख्यमंत्री रेड्डींच्या आदेशामुळे भाजपच्या उमेदवाराला केले मतदान"; कोणत्या आमदाराने केला गौप्यस्फोट?
2
"नक्की कोण जिंकलं? आणि…’’, राज ठाकरेंचा व्यंगचित्रातून शाह पिता-पुत्रावर टीकेचा बाऊन्सर 
3
केवळ ₹१ विकली जाणार होती अपोलो टायर्स; आज आहे टीम इंडियाची ओळख, कोण आहेत मालक, किती आहे संपत्ती?
4
नक्षलवादी संघटनांकडून केंद्र सरकारला शांततेचा प्रस्ताव; १ महिना सशस्त्र संघर्ष विरामाची मागणी
5
३१ जानेवारीपर्यंत निवडणुका पार पाडा; सर्वोच्च न्यायालयाचा आदेश, राज्य निवडणूक आयोगाला सुनावले खडेबोल
6
केवळ संशयामुळे लाेकांची झडती घेता येणार नाही, अपवादात्मक परिस्थितीत लेखी कारणे बंधनकारक : कोर्ट
7
सोशल मीडियावर ‘फोटो एडिट’ ॲपची धूम; सुरक्षित ठेवा तुमचे फोटो, फसवणूक वाढली
8
मुलाच्या वाढदिवसादिवशी पोहोचलं वडिलांचं शेवटचं गिफ्ट, कुटुंबीयांना झाले अश्रू अनावर
9
अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी मानले पंतप्रधान मोदींचे आभार!
10
"इथं काम करणं आता कठीण..."; रस्त्यांवरील खड्डे अन् वाहतूक कोंडीमुळे बंगळुरूतील कंपनी शिफ्ट होणार
11
Crime: "माझ्या बहिणीपासून दूर राहा", वारंवार समजावूनही मित्र ऐकत नव्हता; मग...
12
Today's Horoscope : शेअर्स बाजारात लाभ होईल, आर्थिक स्थिती सुधारेल; वाचा तुमचे आजचे राशीभविष्य काय?
13
मोदी हाच जगातील सर्वांत मोठा ब्रँड; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस : भाजप कार्यकर्त्यांचा ब्रँड निर्माण करून देणारा पक्ष
14
अभियांत्रिकीचे यंदा विक्रमी १ लाख ६६ हजार प्रवेश; कॉम्प्युटर, आयटी, एआयच्या ८८ टक्के जागा भरल्या
15
छगन भुजबळांना कोर्टाचा दणका, बेनामी मालमत्तेचा खटला पुन्हा चालविण्याचे आदेश
16
परशुराम महामंडळाच्या अध्यक्षांना दिला मंत्रिदर्जा; अजित पवार गटाचे आशिष दामले आहेत अध्यक्ष
17
विना‘आधार’ आडमुठेपणा...ती नामुष्की निवडणूक आयोगामुळे सरकारवर ओढवेल
18
उत्तर बार्शी भागातून वाहणाऱ्या चांदनी नदीला महापूर, नरसिंह मंदिर पाण्याखाली!
19
एकनाथ शिंदेंवरील टीकेला प्रत्युत्तर देणार; खा. नरेश म्हस्के यांचा मंत्री नाईकांना अप्रत्यक्ष इशारा
20
परवाना मिळण्याआधीच मोडले नियम; ई-बाईकऐवजी चक्क पेट्रोलवरील गाडी हजर

Cyrus Mistry Accident : सायरस मिस्त्री यांच्या निधनानं भारतीय उद्योग जगताची मोठी हानी, अजित पवारांनी व्यक्त केल्या भावना

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 4, 2022 20:34 IST

Cyrus Mistry Accident News & Live Updates उद्योगपती आणि टाटा सन्सचे माजी प्रमुख सायरस मिस्त्री यांचं रविवारी दुपारच्या सुमारास अपघाती निधन झालं.

उद्योगपती आणि टाटा सन्सचे माजी प्रमुख सायरस मिस्त्री (Cyrus Mistry) यांचं रविवारी दुपारच्या सुमारास अपघाती निधन झालं. पालघरमधील चारोटी येथे झालेल्या अपघातात सायरस मिस्त्री यांनी आपला जीव गमावला. अपघातानंतर जागीच त्यांचा मृत्यू झाला अशी माहिती समोर आली आहे. सायरस मिस्त्री यांच्या अपघाती निधनाने उद्योग जगताला मोठा धक्का बसला आहे. यानंतर विधानसभेचे विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी आपल्या भावना व्यक्त करत त्यांना श्रद्धांजली वाहिली आहे.

टाटा सन्सचे माजी प्रमुख, प्रसिद्ध उद्योगपती सायरस मिस्त्री यांच्या निधनानं भारतीय उद्योग जगताची मोठी हानी झाली आहे. भारतानं एक महान सुपुत्र गमावला आहे. भारतीय उद्योग क्षेत्रात स्वतःच्या कर्तृत्वानं त्यांनी वेगळी छाप उमटवली होती. त्यांना भावपूर्ण श्रद्धांजली!,” असे म्हणत अजित पवार यांनी त्यांना श्रद्धांजली वाहिली. मुंबई-अहमदाबाद महामार्गावर डहाणू तालुक्यातील चारोटीजवळ मर्सिडीज गाडीच्या झालेल्या अपघातात टाटा सन्सचे माजी अध्यक्ष व प्रसिद्ध उद्योगपती सायरस मिस्त्री यांचा जागीच मृत्यू झाला. या अपघातात एकूण दोघांचा मृत्यू तर दोन जण गंभीर जखमी झाले आहेत. जखमींना उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. रविवारी दुपारी सव्वातीनच्या सुमारास अहमदाबादवरून ते मुंबईला येत होते. त्यावेळी हा अपघात झाल्याची माहिती आहे. मर्सिडिस गाडीतून ते प्रवास करत होते. त्यांची गाडी डिव्हायडला धडकल्यामुळे हा अपघात झाल्याची माहिती पालघर पोलीस अधीक्षकांनी दिली आहे. सूर्या नदीवरील नवीन पुलावर चालकाचा गाडीवरील ताबा सुटल्याने धोकादायक डिव्हायडरला कार धडकली.

टॅग्स :Cyrus Mistryसायरस मिस्त्रीAjit Pawarअजित पवारTataटाटा