विक्रोळीत घरात सिलेंडर स्फोट, ८ जण जखमी
By Admin | Updated: October 17, 2015 13:21 IST2015-10-17T12:40:57+5:302015-10-17T13:21:46+5:30
विक्रोळीतील पार्कसाईट परिसरातील वर्षानगर भागातील एका चाळीतील घरात सिलेंडरचा स्फोट होऊन ८ जण जखमी झाले.

विक्रोळीत घरात सिलेंडर स्फोट, ८ जण जखमी
>ऑनलाइन लोकमत
विक्रोळी, दि. १७ - कुर्ल्यातील सिटीकिनारा रेस्टॉरंटमध्ये सिलेंडरचा स्फोट होऊन ८ जण ठार झाल्याच्या दुर्दैवी घटनेला अवघे २४ तासही उलटत नाहीत तोच विक्रोळीतील पार्कसाईट येथे एका घरात सिलेंडरचा स्फोट होऊन ८ जण जखमी झाल्याचे वृत्त आहे. विक्रोळीतील पार्कसाईट परिसरातील वर्षानगर भागातील आंबेडकरनगर सोसायटीत शनिवारी सकाळी पावणेबाराच्या सुमारास ही दुर्घटना घडली. जखमींवर राजावाडी रुग्णालयात उपचार सुरू असून त्यांच्यापैकी दोघांची प्रकृती चिंताजनक असल्याचे समजते.
वर्षानगर परिसरातील या घरातील सिंलेडर लीक होऊन आग लागली आणि त्यातच सिलेंडरचा स्फोट झाला. हे घर रस्त्याला लागून असल्याने घरातील काही लोक आणि पादचारीही असे आठ जण जखमी झाले. घटनेची माहिती मिळताच अग्निशमन दलाच्या अधिका-यांनी तातडीने घटनास्थळी धाव घेत घरात अडकलेल्यांना बाहेर काढत आगीवर नियंत्रण मिळवले आणि जखमींना उपचारासांठी राजावाडी रुग्णालयात दाखल केले.