सिलिंडर स्फोटाने १८ झोपड्या खाक

By Admin | Updated: December 28, 2015 04:06 IST2015-12-28T04:06:30+5:302015-12-28T04:06:30+5:30

शहरातील मिरकरवाडा जेटी परिसरात रविवारी सकाळी लागलेल्या आगीत १८ झोपड्या भस्मसात झाल्या. झोपड्यातील तीन सिलिंडरचे लागोपाठ स्फोट झाल्याने आगीची तीव्रता वाढली.

Cylinder blast killed 18 slums | सिलिंडर स्फोटाने १८ झोपड्या खाक

सिलिंडर स्फोटाने १८ झोपड्या खाक

रत्नागिरी : शहरातील मिरकरवाडा जेटी परिसरात रविवारी सकाळी लागलेल्या आगीत १८ झोपड्या भस्मसात झाल्या. झोपड्यातील तीन सिलिंडरचे लागोपाठ स्फोट झाल्याने आगीची तीव्रता वाढली. या आगीमध्ये झोपड्यांमधील मासेमारांच्या जाळ्या, मिठाची पोती व इतर सामान जळून खाक झाले. या आगीत जीवितहानी झाली नाही. मात्र एक जण किरकोळ जखमी झाला आहे.
रत्नागिरी नगर परिषद आणि फिनोलेक्स कंपनीच्या अग्निशामक दलाच्या तीन बंबांनी ही आग आटोक्यात आणली. त्यामुळे संपूर्ण जेटी परिसरातील शेकडो झोपड्या बचावल्या. (वार्ताहर)

Web Title: Cylinder blast killed 18 slums