शहरं
Join us  
Trending Stories
1
Asha Bhosale: सूरसम्राज्ञी आशा भोसले अनंतात विलीन, दिग्गज गायकांनी गाणं गाऊन दिली अखेरची स्वरांजली
2
होर्मुझ सामुद्रधुनीवर ब्रिटन-फ्रान्सचा 'बिग प्लॅन'; ४० देशांना एकत्र आणणार, ट्रम्प यांना डच्चू
3
दिल्ली, हरयाणा, पंजाबमधील CCTV चे फुटेज थेट पाकिस्तानला, चिनी कॅमेऱ्यातून भारताची हेरगिरी
4
सिंगल चार्जवर ३२० KM रेंज...किंमत फक्त ₹१.२९ लाख! Ola ची नवीन EV स्कूटर लॉन्च
5
Latest Marathi News LIVE: सूरसम्राज्ञी आशा भोसले पंचत्वात विलीन, चाहत्यांनी साश्रू नयनांनी दिला अखेरचा निरोप
6
बालेन शाह यांनी PM मोदींना भेटण्यासाठी ठेवली अट; नेपाळ-भारत संबंध पुन्हा सुधारणार
7
"काही लोकांना ४ लग्नांची सूट, भाजप सत्तेत आल्यास...";  अमित शाह यांनी बंगालमध्ये सभा गाजवली, स्पष्टच बोलले
8
इराणी नेत्यांच्या सुरक्षेसाठी पाकिस्ताननं अख्खी ताकद पणाला लावली; कसं केले होते नियोजन?
9
सीलिंग फॅन की टेबल फॅन? वीज बिल वाचवण्यासाठी कोणता पर्याय सर्वोत्तम? खरेदीपूर्वी नक्की वाचा
10
"US-इराणमध्ये तयार होता अंतिम करार; शेवटच्या क्षणी आला एक कॉल अन् २१ तासांची चर्चा फिस्कटली"
11
श्रीलंकेत भारताची मोठी खेळी; खरेदी केली मोठी शिपबिल्डिंग कंपनी, चीन पाहतच राहिला
12
आशा भोसलेंची नात जनाईला धीर द्यायला पोहोचला 'मानलेला भाऊ' मोहम्मद सिराज, पाहा VIDEO
13
Garud Puran: गरुड पुराणानुसार मृत्यूपूर्वी मिळतात 'हे' रहस्यमयी संकेत; अखेरच्या काळात नेमकं काय घडतं?
14
MPSC भरती प्रक्रियेत मोठा बदल; राज्य मंत्रिमंडळाने घेतले ७ महत्त्वाचे निर्णय, जाणून घ्या
15
आले कधी अन् गेले कधी, समजलंच नाही! आयपीएलमध्ये सर्वात कमी धावसंख्येवर ऑलआउट झालेले संघ
16
८ व्या वेतन आयोगाची बंपर भरती; १.८० लाख रुपये महिना पगार, जाणून घ्या अर्ज करण्याची प्रक्रिया
17
पत्नीला काम सांगायचे म्हणून मुलाने केला पित्याचा खून; गडचिरोलीतील धक्कादायक घटना
18
Kalyan Accident: कल्याण-अहिल्यानगर महामार्गावर भीषण अपघात; ११ जणांचा मृत्यू, दोन गंभीर
19
IPL 2026: "सरळ मैदानाबाहेर जा...!" लाईव्ह सामन्यात सुनील गावस्कर आरसीबीच्या खेळाडूवर भडकले
20
इस्रायलचा महात्मा गांधी हॉस्पिटलवर हल्ला; सगळीकडे विध्वंस, इराणनं शेअर केला Video
Daily Top 2Weekly Top 5

तामिळनाडु, पाँडेचरीला चक्रीवादळाचा इशारा; विदर्भासह मराठवाडा, मध्य महाराष्ट्रात पावसाची शक्यता

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 23, 2020 21:08 IST

राज्यात अनेक ठिकाणी ढगाळ वातावरण असून मध्य महाराष्ट्र व मराठवाड्याच्या बर्याच भागात किमान तापमानात लक्षणीय वाढ झाली आहे.

ठळक मुद्दे२६ नोव्हेंबर रोजी नांदेड, लातूर, उस्मानाबाद जिल्ह्यात विजांच्या कडकडाटासह पावसाची शक्यता

पुणे : बंगालच्या उपसागरात निर्माण झालेल्या कमी दाबाच्या क्षेत्राचे चक्रीवादळात रुपांतर झाले असून त्यामुळे तामिळनाडु, पॉडेचरी यांना धोक्याचा इशारा देण्यात आला आहे. या चक्रीवादळामुळे रायलसीमा, तेलंगणासह विदर्भ, मराठवाडा आणि मध्य महाराष्ट्रात २५ ते २७ नोव्हेंबर दरम्यान पावसाची शक्यता असल्याचा अंदाज हवामान विभागाने व्यक्त केला आहे.

बंगालच्या उपसागरात निर्माण झालेले कमी दाबाचे क्षेत्र सोमवारी सकाळी पाँडेचरीपासून ६०० किमी तर चिन्न्ईपासून ६३० किमी दूर होते. मंगळवारी पहाटे त्याचे चक्रीवादळात रुपांतर होण्याची शक्यता आहे. त्यानंतर मंगळवारी दुपारी त्याचे तीव्र चक्रीवादळात रुपांतर होईल. २५ नोव्हेंबर रोजी ते कराईकल आणि ममालीपूरम दरम्यान किनारपट्टीला धडकण्याची शक्यता आहे. या चक्रीवादळाचा परिणाम २६ नोव्हेंबरपर्यंत जाणवणार आहे. आंध्र प्रदेश किनारपट्टी, तामिळनाडु, दक्षिण कर्नाटक, रायलसीमा, तेलंगणा परिसरात २४ ते २६ नोव्हेंबरदरम्यान जोरदार पावसाचा इशारा देण्यात आला आहे.राज्यात अनेक ठिकाणी ढगाळ वातावरण असून मध्य महाराष्ट्र व मराठवाड्याच्या बर्याच भागात किमान तापमानात लक्षणीय वाढ झाली आहे. विदर्भाच्या काही भागात किंचित वाढ झाली आहे.

२५ नोव्हेंबरला विदर्भात तुरळक ठिकाणी पावसाची शक्यता आहे. २६ नोव्हेंबर रोजी विदर्भात काही ठिकाणी तर, मध्य महाराष्ट्र व मराठवाड्यात तुरळक ठिकाणी पावसाची शक्यता आहे. २७ नोव्हेंबरला मध्य महाराष्ट्र, मराठवाडा व विदर्भात तुरळक ठिकाणी पावसाची शक्यता आहे.......... २६ नोव्हेंबर रोजी नांदेड, लातूर, उस्मानाबाद जिल्ह्यात विजांच्या कडकडाटासह पावसाची शक्यता आहे. २७ नोव्हेंबर रोजी सातारा, सांगली, सोलापूर, औरंगाबाद जिल्ह्यात तुरळक ठिकाणी पावसाची शक्यता आहे.विदर्भातील भंडारा, चंद्रपूर, गोंदिया, गडचिरोली जिल्ह्यात २६ नोव्हेंबर रोजी सर्वदूर हलका ते मध्यम स्वरुपाचा पाऊस पडण्याची शक्यता आहे. तसेच नागपूर, वर्धा आणि यवतमाळ जिल्ह्यात तुरळक ठिकाणी पावसाची शक्यता आहे.

टॅग्स :PuneपुणेRainपाऊसcycloneचक्रीवादळweatherहवामान