शहरं
Join us  
Trending Stories
1
चारही बाजूंनी गोळीबार, मृत्यू समोर; तरी सुरक्षित पडला बाहेर; अमेरिकन पायलटचा थरारक अनुभव
2
विधान परिषदेसाठी शरद पवारांचा उद्धव ठाकरेंना पाठिंबा?; काँग्रेसने मात्र अंतर राखले! पुढे काय?
3
शेतकरी कर्जमाफी अहवाल लवकरच राज्य सरकारकडे; सदस्यांच्या अभिप्रायानंतर होणार शिक्कामोर्तब
4
"...तर नरकाचे दरवाजे उघडतील"; ट्रम्प यांच्या ४८ तासांच्या अल्टीमेटमवर इराणची थेट 'अणुयुद्धाची' धमकी!
5
पेट्रोल ७.४१ रुपयांनी महागले तर डिझेलमध्ये २५ रुपयांची वाढ; 'या' कंपनीने अचानक वाढवल्या किमती
6
रणबीर कपूरच्या 'रामायण'मध्ये अमिताभ बच्चन यांच्या जावयाची एन्ट्री, देवराज इंद्रची भूमिका साकारणार, कोण आहे तो?
7
"बायकोसोबत रेड कार्पेटवर चालताना भीती वाटते...", ऐश्वर्याबद्दल असं का म्हणाला अभिषेक बच्चन?
8
रात्री झोपूनही दिवसभर झोप - सुस्ती जाणवत राहते? पाहा काय आहे यामागचं कारण आणि उपाय
9
मतदान की स्वप्नभंग? फोंड्याचे भवितव्य अधांतरी; ९ रोजीच्या निवडणुकीबद्दल साशंकता
10
लोकल ट्रेनच्या दरवाजाजवळ उभे राहणे हा निष्काळजीपणा नव्हे; उच्च न्यायालयाचा निर्णय
11
आजचे राशीभविष्य, ०५ एप्रिल २०२६: चांगली बातमी, धनलाभ, नशिबाची साथ; हर्षोल्लासाचा दिवस
12
सुनेत्रा पवारांविरोधात शरद पवारांनी उमेदवार दिल्यास काँग्रेसचा पाठिंबा; प्रदेशाध्यक्षांचा नवा प्रस्ताव
13
'धुरंधर'नंतर हाच सिनेमा पाहणार, मृणाल ठाकुरच्या 'डकैत'वर प्रेक्षकांच्या कमेंट्स; ट्रेलर रिलीज
14
भोंदू अशोक खरातला मदत करणाऱ्या महसूल अधिकाऱ्यांना घरी जावे लागेल: चंद्रशेखर बावनकुळे
15
अमली पदार्थ जप्ती प्रकरणात दोघांची अखेर निर्दोष मुक्तता; नियम पालनात सरकारी पक्ष अपयशी
16
पश्चिम रेल्वेच्या ताफ्यात १५ डब्यांच्या २ नवीन लोकल; ३३ टक्के क्षमता वाढणार
17
विशेष लेख: आपल्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात नेमके चालले आहे तरी काय..?
18
साप्ताहिक राशीभविष्य: ७ राशींना मनासारखा काळ, पैशांचा ओघ राहील; यश-प्रगती चौफेर-चौपट लाभ!
19
राज्यातील कुपोषण घटतेय, पण धोका कायम! बालविकास योजनांना गती देण्याचे आव्हान
20
केरळातील डावे सरकार अखेरची घटका मोजतेय, राज्यात एनडीए सत्तेत येईल: पंतप्रधान मोदी
Daily Top 2Weekly Top 5

Cyclone Nisarga: 'मदतीच्या निकषांमध्ये बदल करा; मच्छीमार, शेतकऱ्यांना कर्जमाफी द्या'

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 14, 2020 06:47 IST

चक्रीवादळाचा फटका; मुख्यमंत्र्यांशी भेटीत फडणवीस यांच्या मागण्या

मुंबई : कोकणातील चक्रीवादळग्रस्त मासेमार आणि शेतकऱ्यांना तत्काळ कर्जमाफी द्या, मदतीच्या निकषांमध्ये बदल करा यासह १९ मागण्यांचे निवेदन विधानसभेचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना शनिवारी भेटून दिले. कोकणचा दोन दिवसांचा दौरा करून परतल्यानंतर फडणवीसांनी मुख्यमंत्र्यांना भेटून चर्चा केली.हेक्टरी मदतीच्या निकषामध्ये बदल करण्यात यावा, मासेमारांसह शेतकºयांना कर्जमाफी देण्यात यावी, मासेमारांना डिझेलचे परतावे तत्काळ देण्यात यावे, वीज नसल्याने बँकांचे व्यवहार ठप्प असल्याने तातडीची मदत रोखीने देण्यात यावी आदी मागण्या फडणवीस यांनी केल्या. सरकारने मदतीची घोषणा केली पण ती अद्याप लोकांपर्यंत पोहोचलेली नाही, बँका सुरू होत नाही तोपर्यंत रोखीने मदत करा, शेड/पत्रे इत्यादींचा मोठ्या प्रमाणात काळाबाजार होतो आहे. ते नागरिकांना तत्काळ उपलब्ध करून देण्यात यावेत. रेशनचे धान्य, केरोसीन तत्काळ उपलब्ध करून देण्यात यावे. श्रीवर्धन येथे बस आगारात लोकांना कोंबून निवाºयामध्ये ठेवले आहे. निवाºयांची संख्या वाढवावी, वीज व्यवस्था सुरळीत करावी, कोकणातील शेतकऱ्यांचे चालू कर्ज माफ करण्यात यावे, तसेच नवीन दीर्घमुदतीचे कर्ज व्याज अनुदानासह द्यावे, छोट्या स्टॉलधारकांना आर्थिक मदत द्यावी, घर उभारणीसाठीच्या मदतीत वाढ करावी, पेण येथील गणेश मूर्तिकारांना मदत द्यावी, मासेमारांचीही जुनी कर्ज माफ करण्यात यावीत. त्यांना नव्याने भांडवल प्राप्त होईल, यासाठी मदत करावी आदी मागण्या फडणवीस यांनी केल्या. यावेळी विधानपरिषदेतील विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर, माजी मंत्री आशीष शेलार, रवींद्र चव्हाण, निरंजन डावखरे, सुनील राणे आदी उपस्थित होते.

टॅग्स :Cyclone Nisargaनिसर्ग चक्रीवादळDevendra Fadnavisदेवेंद्र फडणवीसUddhav Thackerayउद्धव ठाकरे