शहरं
Join us  
Trending Stories
1
बँका, पतपेढ्यांमधून निघणारा पैसा निवडणूक आयोगाच्या रडारवर, स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकीसाठी तयारी
2
शून्य रुपयांच्या विश्वासावर ३०० कोटींचा व्यवहार, रक्कम कशी केव्हा मिळेल याचा खरेदीखतात उल्लेखच नाही; एसआयटी करणार तपास
3
आजचे राशीभविष्य,०९ नोव्हेंबर २०२५: कुटुंबीयांशी मतभेद होतील; शक्यतो नवीन कार्याची सुरुवात करु नये
4
संसदेचे हिवाळी अधिवेशन १ ते १९ डिसेंबरदरम्यान
5
आज 'कोंडीवार'; सेंट्रल लोकलने जाणाऱ्यांनो सावधान!
6
आफ्रिकेचे आणखी ८ चित्ते लवकरच येणार भारतात
7
बिहारमध्ये झालेले विक्रमी मतदान कोणाच्या बाजूने? एनडीए आणि महाआघाडीत रस्सीखेच, पहिल्या टप्प्यात ६१.७८% मतदान
8
मनोज जरांगे यांना मुंबई पोलिसांचे समन्स; सोमवारी हजर राहण्याचे निर्देश
9
साप्ताहिक राशीभविष्य: ६ राशींना लाभ, ६ राशींना अवघड काळ; उत्तम धनलाभ, पण पैसे उसने देऊ नका!
10
'मेक इन लातूर'; 'वंदे भारत'चा स्लीपर कोच जूनपासून रुळांवर धावणार, देखभाल दुरुस्ती राजस्थानला होणार
11
बिहार निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर तेज प्रताप यांना वाय प्लस सुरक्षा, गृह मंत्रालयाने घेतला मोठा निर्णय
12
वादग्रस्त पोस्ट मास्तर जनरल मधाळे निलंबित, अधिनस्थ अधिकाऱ्याचा छळ, चिमटे अन् गुदगुल्या भोवल्या
13
'एक रुपयाही न देता व्यवहार झाला, चुकीचे अधिकारी होते की कोण याची चौकशी करणार'; अजित पवारांनी जमीन व्यवहार प्रकरणी स्पष्टच सांगितलं
14
नांदेड हादरलं! सहा वर्षीय चिमुकलीवर २२ वर्षीय तरुणाचे अत्याचार; आरोपीला फाशीची मागणी
15
दिल्लीनंतर आता काठमांडू विमानतळावर तांत्रिक बिघाड, सर्व विमान वाहतूक थांबली
16
TET Exam: नियुक्ती वेळी पात्रता नव्हती म्हणून सेवेतून काढता येणार नाही; टीईटी उत्तीर्ण शिक्षकांच्या प्रकरणात सुप्रीम कोर्टाचा निकाल
17
खुर्चीसाठी भांडल्या, व्हिडिओ वायरल आणि आता निलंबन ! पीएमजी शोभा मधाळे यांचे अनिश्चित काळासाठी निलंबन
18
धावत्या दुचाकीवर तरुणीची छेडछाड, 'त्या' रॅपिडो चालकाला बेड्या; व्हिडीओ व्हायरल झाल्यानंतर पोलिसांची कारवाई
19
नार्को टेस्ट होणार? धनंजय मुंडेंच्या आरोपानंतर मनोज जरांगे पाटील यांचा थेट पोलीस अधीक्षकांकडे अर्ज 
20
'या' राज्यात स्थानिक निवडणुकीत भाजपानं बिनविरोध ७५% जागा जिंकल्या; आज निकालातही 'क्लीन स्वीप'

सोशल मीडियातील फेक न्यूजच्या प्रतिबंधासाठी ‘सायबर सुरक्षा’

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 12, 2019 06:57 IST

सायबर पोलिसांकडून मार्गदर्शक पुस्तिका : ४८ मतदारसंघांतील निवडणूक अधिकाऱ्यांसाठी ठरणार उपयुक्त

मुंबई : लोकसभा निवडणुकीच्या प्रचारासाठी सोशल मीडियावर केला जाणारा प्रचार सर्वांत आघाडीवर आहे. प्रत्येक राजकीय पक्ष, उमेदवार व त्यांच्या समर्थकांकडून विरोधकांविरुद्ध फेक न्यूज व खोडसाळ घटना पसरविल्या जात आहेत. अशा बातम्यांना प्रतिबंध घालण्यासाठी महाराष्टÑ सायबर विभागाने पुढाकार घेतला आहे. सोशल मीडियाच्या प्रचाराबाबत जागृतीसाठी सायबर पोलिसांनी ‘सायबर सुरक्षा’ ही मार्गदर्शक पुस्तिका बनविली आहे.

या पुस्तिकेत निवडणूकविषयक माहितीची सुरक्षितता, संरक्षित पासवर्ड, ईमेल्स, सोशल मीडियाचा वापर करताना घ्यावयाची काळजी आदींबाबत तपशीलवार माहिती निवडणूक अधिकाऱ्यांना करून देण्यात आली आहे. राज्याचे मुख्य निवडणूक अधिकारी अश्वनी कुमार यांच्या हस्ते त्या पुस्तिकेचे नुकतेच प्रकाशन करण्यात आले. या वेळी राज्याचे सायबर विभागाचे पोलीस महानिरीक्षक ब्रिजेश सिंह, अधीक्षक डॉ. बाळसिंग रजपूत आदी उपस्थित होते.

लोकसभा निवडणुकीची प्रक्रिया अधिक सुटसुटीतपणे करण्यासाठी आयोगाकडून आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर केला जात आहे. सध्याच्या सोशल मिडियावर प्रसारित होणारा मजकूर पाहता त्याचा गैरवापर होऊ नये आणि निवडणूक प्रक्रिया तांत्रिकदृष्ट्या सुरक्षित राहण्यासाठी बनविलेल्या पुस्तिकेत भारत सरकारने धोकादायक म्हणून घोषित केलेल्या ४२ अ‍ॅप्सची यादी प्रसिद्ध केली आहे.

आयोगाच्या सी-व्हिजिलसह इतर अधिकृत अ‍ॅप्स, संकेतस्थळे तसेच तक्रारींसाठी महत्त्वाच्या नोडल्स संस्थांची माहिती या पुस्तिकेत आहे. हॅक अथवा हायजॅक झालेल्या सोशल मीडिया खात्यांच्या बाबतीत महाराष्ट्र सायबरशी संपर्क साधण्याचे आवाहन अधीक्षक रजपूत यांनी केले आहे. ही पुस्तिका मराठी, हिंदी, इंग्रजी, गुजराती आणि उर्दू या भाषांत बनविण्यात आली आहे.असे आहेत पर्यायफेसबुक पोस्टच्या वर उजव्या बाजूच्या कोपºयात ‘ही फेक न्यूज स्टोरी आहे’ हा पर्याय तर व्हॉटसअ‍ॅपवर अफवा अथवा माहिती खातरजमा करण्यासाठी ‘व्हॉटसअ‍ॅप चेकपॉइंट टीपलाइन’वर पाठविण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत. व्हॉटसअ‍ॅपवर निवडणुकीच्या संदर्भातील खोट्या बातम्या, अफवा, प्रक्षोभक मजकूर, चित्रांबद्दल सतर्क राहण्यासह त्याविषयी महत्त्वाच्या टिप्स देण्यात आल्या आहेत.

टॅग्स :Fake Newsफेक न्यूज