‘सायबर गुन्हे रोखणार’
By Admin | Updated: December 17, 2014 03:05 IST2014-12-17T03:05:40+5:302014-12-17T03:05:40+5:30
सायबर गुन्ह्णांचे वाढते प्रमाण आणि त्यामुळे पुढच्या काळात निर्माण होणारा धोका लक्षात घेता, हे गुन्हे रोखण्यासाठी पोलिसांना विशेष प्रशिक्षण देण्यात येईल

‘सायबर गुन्हे रोखणार’
नागपूर : सायबर गुन्ह्णांचे वाढते प्रमाण आणि त्यामुळे पुढच्या काळात निर्माण होणारा धोका लक्षात घेता, हे गुन्हे रोखण्यासाठी पोलिसांना विशेष प्रशिक्षण देण्यात येईल, असे आश्वासन गृहराज्य मंत्री रणजित पाटील यांनी मंगळवारी दिले.
काँग्रेसचे अनंत गाडगीळ यांनी राज्यात वाढत असलेल्या सायबर गुन्ह्णांकडे सभागृहाचे लक्ष वेधले. विविध संकेतस्थळांच्या माध्यमातून वस्तूंची विक्री केली जात आहे. वस्तूंच्या दर्जाबाबत शंका असून, अनेकांची या माध्यमातून फसवणूकही झाली आहे. या कंपन्यांची विश्वासार्हता तपासण्याची गरज आहे, असे गाडगीळ म्हणाले.
राज्य शासनाने यासंदर्भात कायदा केला असला तरीही २०१० ते २०१३ या काळात सायबर गुन्ह्णांमध्ये वाढ झाली आहे. मुंबई आणि पुण्यातही अशीच स्थिती आहे. पुढच्या काळात अशाप्रकारचे गुन्हे रोखण्यासाठी सरकार भक्कम पावले उचलणार आहेत, असे गृहराज्य मंत्री रणजित पाटील यांनी सांगितले. सायबर कॅफेची नोंदणी तसेच प्रशिक्षणाच्या वेळी पोलिसांना सायबर गुन्हे रोखण्यासाठी विशेष प्रशिक्षण दिले जाईल. (प्रतिनिधी)