स्थायी समितीतून खासदारांचा पत्ता कट
By Admin | Updated: March 10, 2015 04:15 IST2015-03-10T04:15:43+5:302015-03-10T04:15:43+5:30
पालिकेची आर्थिक नाडी असलेल्या स्थायी समितीचे अध्यक्षपद सलग चारवेळा भूषविणारे राहुल शेवाळे दिल्लीवीर होताच या समितीतून अखेर

स्थायी समितीतून खासदारांचा पत्ता कट
मुंबई : पालिकेची आर्थिक नाडी असलेल्या स्थायी समितीचे अध्यक्षपद सलग चारवेळा भूषविणारे राहुल शेवाळे दिल्लीवीर होताच या समितीतून अखेर त्यांची गच्छंती करण्यात आली आहे़ तसेच दरवर्षी होणाऱ्या नवीन सदस्य निवडीमध्ये शिवसेनेने ज्येष्ठ नगरसेवक सुरेंद्र बागलकर यांच्या तोंडाला पाने
पुसली़
स्थायी, शिक्षण, सुधार, बेस्ट या चार समित्यांना वैधानिक दर्जा आहे़ त्यामुळे या समितीचे पद मिळवण्यासाठी नगरसेवकांमध्ये चढाओढ सुरू असते़ ज्याचे पारडे पक्षात जड त्याला मलईदार समिती असे गणित असते़ त्यानुसार पक्षाची मर्जी सांभाळणारे राहुल शेवाळे गेली अनेक वर्षे स्थायी समितीचे सदस्य व चार वर्षे अध्यक्षपदावर होते़
मात्र खासदार होताच त्यांची पालिकेतील रुची व हजेरी कमी होऊ लागली़ अनेकवेळा मिनतवाऱ्या केल्यानंतर शेवाळे बैठकांना उपस्थिती लावत होते़ त्यामुळे अखेर सदस्यांच्या फेरनिवडीत पक्षाने त्यांना निवृत्त केले़ त्यांच्या जागी ज्येष्ठ व जुने दावेदार सुरेंद्र बागलकर यांची वर्णी लागण्याची शक्यता होती़ मात्र त्यांना सुधार समितीतूनही डिच्चू देण्यात आला आहे़ (प्रतिनिधी)