शहरं
Join us  
Trending Stories
1
"पुढील ४८ तास जिथे आहात, तिथेच रहा", ट्रम्प यांच्या धमकीनंतर इराणमधील भारतीयांना केंद्राकडून अलर्ट
2
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
3
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
4
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
5
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
6
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
7
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
8
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
9
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
10
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
11
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
12
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
13
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
14
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
15
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
16
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
17
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
18
GEN Z मध्ये वाढतोय हेअर कलर ट्रेंड; ब्ल्यू-रेड-गोल्डन केसांच्या रंगावरुन ओळखा त्यांचं व्यक्तिमत्व
19
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
20
Manipur rocket attack: गोळ्यांचा आवाज आणि हिंसक जमाव;  मणिपूरमधील हिंसाचाराचे व्हिडीओ आले समोर
Daily Top 2Weekly Top 5

वीज बिलाचा धनादेश न वटल्यास ग्राहकांना दंडाचा शॉक 

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 28, 2018 18:39 IST

महावितरणनने चेक बाऊन्सच्या दंडाची रक्कम साडेतीनशे रुपयांवरुन तब्बल दीड हजार रुपयांपर्यंत वाढविली आहे.

ठळक मुद्देया निर्णयाची अंमलबजावणी १ नोव्हेंबरपासून करण्यात येणार

पुणे : वीज बिल भरण्यापोटी काढलेला धनादेश कोणत्याही कारणामुळे वटला न गेल्यास (चेक बाऊन्स) ग्राहकांना दंडाचा शॉक बसणार आहे. महावितरणनने चेक बाऊन्सच्या दंडाची रक्कम साडेतीनशे रुपयांवरुन तब्बल दीड हजार रुपयांपर्यंत वाढविली आहे. या निर्णयाची अंमलबजावणी १ नोव्हेंबरपासून करण्यात येणार असल्याचे महावितरणकडून सांगण्यात आले. महावितरणने वीजदर निश्चितीकरणासाठी दाखल केलेल्या मध्यावधी आढावा याचिकेच्या सुधारित आदेशामध्ये महाराष्ट्र विद्युत नियामक आयोगाने हा आदेश दिला आहे. पुणे, पिंपरी चिंचवडसह मुळशी, जुन्नर, आंबेगाव, मावळ, खेड तालुक्यातील सुमारे १ लाख ७५ हजार लघुदाब वीजग्राहक हे धनादेशद्वारे दरमहा वीजबिलांचा भरणा करतात. यातील दरमहा सुमारे साडेतीन ते ४ हजार धनादेश विविध कारणांमुळे वटले जात नाहीत. त्यामुळे या पुर्वी ग्राहकांना साडेतीनशे रुपये दंड आकारण्यात येत होता. मात्र १ नोव्हेंबरपासून धनादेश न वटल्यास दीड हजार रुपये अथवा बँकेचे शुल्क यापैकी जी रक्कम जास्त असेल ती दंड म्हणून आकारण्यात येईल, असे महावितरणने स्पष्ट केले.वीजबिल भरण्याच्या अंतीम मुदतीपूर्वी दिलेला धनादेश वटणे आवश्यक आहे. त्यानंतरच बिलाची रक्कम प्राप्त झाल्याची नोंद होते. परंतु अनेक वीजग्राहक अंतिम मुदतीच्या एक-दोन दिवसांपूर्वी धनादेशाद्वारे वीजबिलाची रक्कम भरतात. धनादेश वटण्यास साधारणत: तीन ते चार दिवसांचा कालावधी लागू शकतो. त्यामुळे मुदतीनंतर वीजबिलाचा भरणा झाल्यास संबंधीत ग्राहकांना धनादेशद्वारे भरलेली रक्कम थकबाकी म्हणून पुढील बिलात लागू करण्यात येते. कोणत्याही कारणाने धनादेश न वटल्यास आर्थिक दंडासह वीजपुरवठा खंडित करण्याची कारवाई देखील केली जाते.संकेतस्थळ, मोबाईल अ‍ॅप अथवा ईसीएसद्वारे विज बिल भरण्याची सोय उपलब्ध आहे. इंटरनेट व मोबाईल अ‍ॅपच्या माध्यमातून पुणे परिमंडलात सद्य:स्थितीत सुमारे ९ लाख ५२ हजार वीजग्राहक सुमारे १७७ कोटी रुपयांचा दरमहा वीजबिल भरणा करीत आहेत. तसेच ईसीएसद्वारे बिल भरणासाठी सुमारे सव्वादोन लाख वीजग्राहकांनी नोंदणी केलेली आहे. तसेच, घरबसल्या दरमहा सुमारे २० कोटी रुपयांचा वीजदेयकांचा भरणा ईसीएसधारक करीत आहेत. त्यामुळे धनादेशऐवजी वीजग्राहकांनी या सुविधांचा लाभ घ्यावा, असे आवाहन महावितरणकडून करण्यात आले आहे.

टॅग्स :Puneपुणेmahavitaranमहावितरणbankबँक