एटीएम घोटाळ्याप्रकरणी म्होरक्या ताब्यात

By Admin | Updated: May 4, 2017 22:18 IST2017-05-04T22:18:13+5:302017-05-04T22:18:13+5:30

सुशुलने आपल्या दोन सहकारी मित्रांसह एटीएममध्ये भरणा करण्यासाठी दिलेल्या पैशातून थोडे-थोडे पैसे बाजूला काढले.

In the custody of the leader in the ATM scam | एटीएम घोटाळ्याप्रकरणी म्होरक्या ताब्यात

एटीएम घोटाळ्याप्रकरणी म्होरक्या ताब्यात

रत्नागिरी : एटीएममध्ये भरण्यासाठी दिलेल्या पैशातून सव्वा कोटी रूपयांचा घोटाळा करणाऱ्या म्होरक्याला आर्थिक गुन्हे अन्वेषण शाखेच्या पथकाने ताब्यात घेतले आहे. सुशील सुभाष मोरे (रा. पोफळी) असे त्याचे नाव असून, त्याची कसून चौकशी केली जात आहे. त्याचा अटकपूर्व जामीन अर्ज न्यायालयाने फेटाळल्यानंतर लगेचच त्याला अटक करण्यात आली आहे.
चिपळूण तालुक्यासह, खेड, संगमेश्वर येथील एटीएममध्ये भरण्यासाठी देण्यात आलेल्या रकमेमध्ये टप्प्याटप्प्याने अफरातफर केली गेली. नोटाबंदीचा निर्णय झाल्यानंतर जेव्हा आॅडिट केले गेले, तेव्हा हा अपहार झाल्याचे उघड झाले. या प्रकरणी अरविंद बनगे यांनी चिपळूण पोलीस स्थानकात तक्रार दिली होती. सिक्योरिट्रान्स इंडिया प्रा. लि. मध्ये काम करणाऱ्या सुशील सुभाष मोरे (रा. पोफळी), नीलेश पवार (रा. काटे) व नीलेश लाड (रा. चिपळूण) या तिघांविरोधात सव्वा कोटींच्या अफरातफरीचा गुन्हा दाखल करण्यात आला होता.आॅगस्ट ते नोव्हेंबर या कालावधीत सुशील मोरे, नीलेश लाड व नीलेश पवार यांना रत्नागिरी जिल्ह्यातील खेड, खेर्डी, चिपळूण, सावर्डे, मार्गताम्हाणे, संगमेश्वर, लोटे व शिरगांव येथील एटीएममध्ये पैसे भरण्याचे काम सिक्योरिट्रान्स इंडिया प्रा. लि. या कंपनीकडे होते. सुशुलने आपल्या दोन सहकारी मित्रांसह एटीएममध्ये भरणा करण्यासाठी दिलेल्या पैशातून थोडे-थोडे पैसे बाजूला काढले. बराच काळ हा प्रकार सुरू होता. कंपनीला खोटे संदेश पाठवून संपूर्ण रक्कम भरल्याची माहिती ते देत होते. थोडे-थोडे करत त्यांनी सुमारे १ कोटी २६ लाख ९६ हजारांची अफरातफर केली. नोटाबंदीमुळे ही अफरातफर बाहेर पडली. याप्रकरणी पोलिसांनी नीलेश लाड व नीलेश पवार याला यापूर्वीच अटक केली होती.

Web Title: In the custody of the leader in the ATM scam

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.