मराठी रंगभूमीची सद्य:स्थिती ‘जेमतेम’
By Admin | Updated: February 12, 2015 03:22 IST2015-02-12T03:22:54+5:302015-02-12T03:22:54+5:30
मराठी रंगभूमीची सद्यस्थिती ‘जेमतेम’ असून या रंगभूमीची आगेकूच यशस्वीपणे सुरू राहण्यासाठी द्रष्टे नाटककार निर्माण होणे महत्त्वाचे

मराठी रंगभूमीची सद्य:स्थिती ‘जेमतेम’
कोल्हापूर : मराठी रंगभूमीची सद्यस्थिती ‘जेमतेम’ असून या रंगभूमीची आगेकूच यशस्वीपणे सुरू राहण्यासाठी द्रष्टे नाटककार निर्माण होणे महत्त्वाचे आहे, असे मत ज्येष्ठ नाट्य समीक्षक डॉ. वि. भा. देशपांडे यांनी बुधवारी येथे मांडले.
शिवाजी विद्यापीठाच्या संगीत व नाट्यशास्त्र अधिविभागातर्फे आयोजित ‘रंगमंचीय कला : वर्तमानकालीन बदलते प्रवाह’ या विषयावरील राष्ट्रीय परिषदेच्या उद्घाटन समारंभात ते बोलत होते. अध्यक्षस्थानी कुलगुरू डॉ. एन. जे. पवार होते.
सध्या कमी वेळात चटपटीत पाहण्याकडे लोकांचा कल वाढला. त्यातूनच गेल्या दहा वर्षांत प्रबोधन बाजूला पडले आणि उथळ मनोरंजनाने त्याची जागा घेतली आहे, असे सांगून ते म्हणाले, एकीकडे प्रवाहीपणाचा आग्रह कायम असतानाच नाटकांच्या आकारावरही परिणाम झाला आहे. पाच अंकांवरून तीन अंकांवर आलेले नाटक आता, तर दोन अंकी, एकांकिका किंवा दीर्घांकी बनले आहे.